
पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १८ मध्ये भाजपा युतीच्या उमेदवार सौ.प्रीती जॉर्ज (म्हात्रे) यांच्या प्रचाराला वेग आला असून भारतीय जनता पक्ष युतीला आघाडी मिळताना दिसत आहे. या प्रचाराचा भाग म्हणून भाजप युती महिला आघाडीच्या महिला कार्यकर्त्यांनी प्रभागात घराघरांत जाऊन मतदारांची भेट घेतली.
या प्रचारावेळी पनवेल महानगरपालिकेतून बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेविका सौ.ममता प्रितम म्हात्रे या उपस्थित होत्या. त्यांच्या सोबत महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उमेदवारांच्या प्रचारार्थ मतदारांशी संवाद साधत भाजपाच्या विकासाभिमुख धोरणांची माहिती दिली.
पनवेल शहरात भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सुरू असलेली विकासकामे, नागरी सुविधांचा विस्तार तसेच भविष्यातील विकास आराखडा याबाबत मतदारांना माहिती देण्यात आली. महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विशेषतः महिला मतदारांशी संवाद साधत त्यांचे प्रश्न व अडचणी जाणून घेतल्या.
या प्रचार दौऱ्याला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून प्रभाग क्रमांक १८ मध्ये भाजपाच्या कार्यपद्धतीवर जनतेचा विश्वास अधिक दृढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. एकजुटीने आणि संघटनात्मक ताकदीच्या जोरावर भाजपा युतीचा प्रचार प्रभावीपणे सुरू असल्याचे या दौऱ्यातून स्पष्ट झाले.
याप्रसंगी भाजपा ज्येष्ठ नेते श्री बाळासाहेब पाटील, आमदार श्री विक्रांत पाटील, मा.विरोधी पक्षनेते श्री.प्रितम म्हात्रे, सभागृह नेते श्री परेश ठाकूर, नगरसेवक श्री नितीन पाटील भाजपचे स्थानिक पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येत उपस्थित होत्या.



Be First to Comment