
वन्यजीव संरक्षण कायद्यात बदल करणे काळाची गरज – खासदार धैर्यशील पाटील
पेण, ता. ३ (वार्ताहर) : महाराष्ट्रासह रायगड जिल्ह्यात सध्या बिबटे मोठ्या प्रमाणावर हल्ले करत आहेत त्यामुळे वनविभाग हा वनरक्षणासह वन्यजीव संरक्षण करत असताना त्यांच्या कुटुंबीयांची काळजी लोकप्रतिनिधींनी घेणे गरजेचे आहे त्यामुळे नुसते नसबंदी करून चालणार नाही तर यावर वन्यजीव संरक्षण कायद्यात बदल करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन खासदार धैर्यशील पाटील यांनी केले.
वनविभाग अलिबाग अंतर्गत पेण रामवाडी येथे बांधण्यात आलेल्या
वनपरिक्षेत्र कार्यालयाचे उद्घाटन खासदार धैर्यशील पाटील, आमदार रवीशेठ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी रायगड जिल्हा उपवनसंरक्षक अधिकारी राहुल पाटील, सहाय्यक वनसंरक्षक भाऊसाहेब जवरे, वन अधिकारी कुलदिप पाटकर, पेण वनपरिक्षेत्र अधिकारी सपना सोनार, वन अधिकारी बालाजी आडे, भाजप जिल्हा महामंत्री वैकुंठ पाटील, डीवायएसपी जालिंदर नालकुल,
पोलिस निरीक्षक संदीप बागुल, उद्योजक राजुशेठ पिचिका, कृबास.सभापती महादेव मानकर, माजी जिप.सदस्य प्रभाकर म्हात्रे,
कॉन्टॅक्टर राकेश पाटील, संकेत मानकर आदींसह वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी आमदार रवीशेठ पाटील यांनीही जिल्ह्यातील वनविभागा कडून होणाऱ्या कामाबाबत समाधान व्यक्त केले.तर वनविभागाच्या माध्यमातून आजवर अनेक चांगली कामे होत असताना ज्या ठिकाणी आदिवासी बांधव व इतर घटकांसाठी रस्ता, पाईपलाईन किंवा इतर कामांकरीता वनविभागाकडून अडचण निर्माण होत होती त्या अडचणी सुद्धा वरिष्ठ अधिकारांच्या मार्गदर्शनाखाली सोडविण्यात आल्या आहेत रायगड जिल्ह्याच्या ठिकाणी मिळणाऱ्या सुविधांप्रमाणे स्थानिक वन विभागाच्या कुटुंबीयांना पण अशाच सुविधा मिळाव्यात याकरिता आपणाकडून निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी यावेळी उपवनसंरक्षण अधिकारी राहुल पाटील यांनी प्रस्तावनामध्ये केली.यावेळी वनविभागाच्या माध्यमातून खासदार व आमदारांचा सन्मान करण्यात आला.



Be First to Comment