
प्रतिनिधी (सचिन पाटील )महाड – येथे २८ डिसेंबर या दिवशी हिंदू जनजागृती समितीतर्फे प्रथमोपचार प्रशिक्षण आणि त्याचे दैनंदिन जीवनातील महत्त्व या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
प्रत्येक नागरिकाला प्रथमोपचाराचे ज्ञान असणे आवश्यक आहे,यादृष्टीने ठिकठिकाणी त्याविषयीचे प्रशिक्षण वर्ग घेतले जातात. याचाच एक भाग म्हणून महाड येथे प्रथमोपचार प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले होते.
यावर्गामध्ये १६ जिज्ञासूनी सहभाग घेतला होता.
यात प्रथमोपचार प्रशिक्षणाचा उद्देश व आवश्यकता याबद्दल माहिती मिळाली. रुग्णाच्या नाकातून, तोंडातून रक्तस्त्राव झाला तर तो कसा थांबवायचा,पाय मुरगळल्या वर काय करायला पाहिजे तसेच इतर दुखापतींवर कसे प्रथमोपचार करायचे हे शिकायला मिळाले.
हे ज्ञान घ्यायला आम्हाला आवडेल असे जिज्ञासूंनी सांगितलं त्यासोबतच या ज्ञानामुळे आपण स्वतःसुद्धा प्रथमोपचार करू शकतो हा विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण झाला.



Be First to Comment