
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व नागोठणे पोलीस ठाण्याची कारवाई, आरोपीस पाच दिवस पोलीस कोठडी मंजूर
नागोठणे : याकुब सय्यद
नागोठणे पोलीस ठाण्यात दिनांक 2 डिसेंबर 2025 व दिनांक 3 डिसेंबर 2025 रोजी अनुक्रमे दोन घरफोडीचे गुन्हा क्रमांक 187/25 व 188/25 असे गुन्हे दाखल झाले होते. याबाबत पोलीस अधीक्षक रायगड आंचल दलाल यांचे तात्काळ कारवाईचे आदेश प्राप्त होताच रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व नागोठणे पोलीस ठाणे यांनी संयुक्तिक रित्या तपास करून सदरील गुन्ह्यातील आरोपीस कौशल्यपूर्ण हाताळणी करून अटक केली आहे.
याबाबत नागोठणे पोलीस ठाण्याकडून प्राप्त झालेली माहिती पुढील प्रमाणे नागोठणे पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक 188/ 25 हा घरफोडीचा गुन्हा दिनांक 03/12/25 तसेच गुन्हा क्रमांक 187/25 हा दिनांक 02/12/25 असे दोन घरपोडीचे गुन्हे दाखल झाले असून सदर बाबत तात्काळ कारवाईचे आदेश सन्माननीय पोलीस अधीक्षक आंचल दलाल मॅडम यांचे कडून प्राप्त झाल्याने रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व नागोठणे पोलीस ठाणे यांनी संयुक्तरीत्या सदर गुन्ह्यातील आरोपीत यांचा तांत्रिक विश्लेषण व वैज्ञानिक धागेद्वारे यांच्या आधारे नमूद आरोपी नामे कुलदीप राधेश्याम डोडवे, वय 22 वर्ष, राहणार गेटा,पोस्ट तांडा,तालुका कुक्षी, राज्य मध्य प्रदेश येथून सापळा रुचून कौशल्यपूर्ण हाताळणी अटक करण्यात आली आहे.
पुढील तपास नागोठणे पोलिस ठाणे करीत आहेत. नागोठणे पोलीस ठाणे गु. र. नं. 188/2025 बीएनएस कलम 305(अ), 331(3)(4) घरफोडी या गुन्ह्यात कुलदीप राधेशाम डोडवे, वय – 22 वर्ष,राहणार- गेट्टा,तालुका कुक्षी, जिल्हा – धार, मध्य प्रदेश यास बुधवार दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी 12.04 वाजता अटक करण्यात आली असून त्याचे कडे गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपूस करता त्याने सदर गुन्हा केल्याची तसेच नागोठणे पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 187/2025 बी एन एस कलम 305(अ) वगैरे गुन्हा केला असल्याची देखील कबुली दिलेली आहे. सदर दोन्ही गुन्ह्यांचा पुढील तपास नागोठणे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत. सदर आरोपीस पाच दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने मंजूर केली आहे.



Be First to Comment