
अमेरिकेत नोकरी करणाऱ्या अपूर्वा ने ठेवली “जाणीव”
पनवेल : प्रतिनिधी
सुकापूर येथील जाणीव फाऊंडेशन तसेच गोल्डन ग्रुप चे सदस्य असलेले आशुतोष पाटील हे व्यवसायाने इंजिनीयर असून त्यांची मुलगी अपूर्वा हीने आपले शिक्षण अमेरिका येथे पूर्ण केले आणी सध्या ती अमेरिकेत एका मोठ्या कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत आहे. सध्या अपूर्वा ही भारतात आली आहे.
भारतात येऊन आपल्या कुटुंबा सोबत वेळ घालवत असतानाचं आपण समाजाचेही काही देणे लागतो ही जाणीव तिला स्वस्थ बसून देत नव्हती. यातूनच अपूर्वा आणि तिचे वडील आशुतोष पाटील व आई संगीता पाटील यांनी “स्वप्नालय” या मुलींच्या बालगृहात उबदार गोधडी आणि खाऊ वाटप कार्यक्रम आयोजित केला.
त्यानुसार संपूर्ण कुटुंबाने थंडीच्या दिवसांत मुलींना गरम ब्लँकेट आणि पौष्टिक खाऊ वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा छोटासा प्रयत्न केला.



Be First to Comment