
दुष्मी खारपाडा येथे रेल्वे च्या धडकेने बिबट्याच्या ट्रॅकवर झाल्या चिंधड्या
पेण, ता. २८ (वार्ताहर) : पेण तालुक्यातील दुष्मी खारपाडा सावरोली या गावानजीक जाणाऱ्या रेल्वे ट्रॅकवर सकाळच्या सुमारास बिबट्याला रेल्वे एक्सप्रेसने धडक दिल्याने त्याचा ट्रॅक वर जागीच मृत्यू झाला या बाबतची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिसराची पाहणी करत सदर बिबट्याला पेण वैद्यकीय अधिकारी पी. एन.गायकवाड यांनी तपासले असता त्याला मृत घोषित केले त्यानुसार मृत्यू झालेल्या बिबट्याचे पोस्टमार्टम करून त्याला योग्य जंगलात आग्नी देण्यात आली आहे.
दि. २७ रोजी सकाळच्या सुमारास पेण तालुक्यातील दुष्मी खारपाडा या भागातून जाणाऱ्या रेल्वे ट्रॅकवर बिबट्याचा मृत्यू झाल्याची माहिती संबंधित नागरिकांसह वनविभागीय अधिका-यांना मिळाली असता त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी भेट देत पहाणी केली असता सदर बिबट्या हा नर जातीचा वय पाच वर्ष असून साधारणपणे ४० किलो वजनाचा असल्याचे दिसून आले त्याला वैद्यकीय अधिकारी डॉ.गायकवाड यांनी तपासले असता त्याचा मृत्यू झाल्याची घोषित केले त्यानुसार त्याचे पोस्टमार्टम करून त्याला लाडवली राखीव वन सर्वे (रोप वाटीका) नंबर ३५ मध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अग्नी देण्यात आले.
यावेळी रायगड जिल्हा उपवनसंरक्षक अधिकारी राहुल पाटील, सहाय्यक उप वनसंरक्षक पनवेल सागर माळी परिमंडल वन अधिकारी बालाजी आडे, सचिन मोरे, वनरक्षक सुहास राऊत, राजेश साबळे, वसंत पोइलकर, रुदास बिज, निशा उके, राजेश गायकवाड , शेखर कुवर ढगे, शिल्पा जाधव, सागर कडू रोहित घुटे, सुप्रिया पाईकराव आदि उपस्थित होते.



Be First to Comment