
पेण, ता. २७ (वार्ताहर) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, युवा नेते अमित यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्ह्यात काम करणारे उपजिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पेण तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला आहे.
जिल्ह्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता मनसे पक्षात अनेक तरुणांचा ओघ वाढत असताना संदीप ठाकूर यांनी जिल्हाभर पक्ष वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू केले असून तरुणांच्या समस्यांसह त्यांचे प्रश्न अनेकदा सोडविले आहे.त्यांचे नेतृत्व पाहता पेण तालुक्यातील समाजसेवक रुपेश म्हात्रे (बुवा), महादेव ठाकुर, प्रणय म्हात्रे, जयेश म्हात्रे यासह इतरही युवा कार्यकर्त्यांनी मनसे मध्ये जाहीर प्रवेश केला.यावेळी महिला आघाडीच्या गौरी व्होरा, उपतालुकाध्यक्ष प्रसाद पाटील, नितेश पाटील, विजय पाटील, पंकज पाटील, जिते विभाग विवेक घरत आदि उपस्थित होते.



Be First to Comment