
आमदारकी नव्हे तर जनतेची सेवा हा आमचा व्यवसाय – पंडीत पाटील
रोहा ( प्रतिनिधी ) रोहा तालुक्यातील चणेरा विभागातील विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा सांगता कार्यक्रम कोकबन येथील बापदेव मंदिराच्या प्रांगणात संपन्न झाला. याप्रसंगी बोलताना आमदारकी नव्हे तर जनतेची सेवा हा आमचा व्यवसाय असल्याचे प्रतिपादन पंडीत पाटील यांनी या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. याप्रसंगी व्यासपीठावर माजी राजिप सदस्या भावना पाटील, कोकबन सरपंच तेजस्विनी वाजंत्री, रोह्याचे माजी उपनगराध्यक्ष वसंत शेलार, रोह्याचे माजी शहर अध्यक्ष यज्ञेश भांड, अल्पसंख्यांक सेल जिल्हा अध्यक्ष लियाकत खोत, युवक उपाध्यक्ष नंदेश यादव, जितेंद्र जोशी उपस्थित होते.
लोकप्रतिनिधीनी जनतेची विकासकामे करण्यासाठी उत्सुक असल्यास जनतेकडून भरघोस प्रेम मिळते याचा अनुभव आज मला आला. परंतु जनतेचे आमच्यावरील प्रेम पाहून मन भरून आले आहे. आज दुपारपासून कोट्यावधी रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला असून लवकरच सर्व विकासकामे पूर्ण होतील असा विश्वास पंडीत पाटील यांनी सर्वाना दिला.आज चणेरा विभागात अंतर्गत रस्ते, गटारे, नवीन डीपी, शाळा तसेच अंगणवाडी अशा विविध कामांचे भूमिपूजन करण्यात आले.सर्व नागरिकांनी पंडितशेठ पाटील व भावना पाटील यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले.
या दौऱ्यात लियाकत खोत, नंदेश यादव, जितेंद्र जोशी, अतुल पाटील, सुहास भगत, मंगेश मोहिते, शशिकांत कडू, कृष्णा चोगले, निलम वारगे, संदीप खेरटकर, विलास सावंत, किरण जाधव, संदीप कदम यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह सहभाग घेतला. या दौऱ्यात पंडीत पाटील यांनी महादेवखार माजी सरपंच नारायण गायकर, जाकीर खोत, पांडुरंग पवार यांच्या घरी सांत्वनपर भेट दिली.



Be First to Comment