
पनवेल, दि.26 (वार्ताहर) ः राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता एक तरुण कुठेतरी निघून गेल्याने तो हरविल्याची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
विश्वास कमल शर्मा (18 वर्षे 9 महिने) हा वाकडी येथे राहणारा असून तो कोणास काही एक न सांगता कुठेतरी निघून गेला आहे. शरीर बांधाने मजबूत, उंची 5 फुट 6 इंच, रंग गोरा, डोक्याचे केस काळे, डोळे काळे, नाक सरळ, चेहरा गोल, दाढी मिशी नाही, अंगात सफेद रंगाचा टी-शर्ट व लाईट ब्ल्यू कलर व ब्लॅक कलरची जिन्स पॅन्ट, पायात पांढर्या रंगाचे बुट असून त्याला इंग्रजी, हिंदी व मराठी भाषा अवगत आहे. या तरुणाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्याने पनवेल तालुका पोलीस ठाणे किंवा पो.हवा.धनाजी तांडेल यांच्याशी संपर्क साधावा.



Be First to Comment