

नवनिर्वाचित नगरसेविका आफ्रीन अखवारे यांच्याकडून स्वखर्चाने भिंत बांधली
पेण, ता. २४ (वार्ताहर) : पेण शहरातील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आणि एचडीएफसी बँकेच्या बाजूला असणाऱ्या मुतारीची गेल्या अनेक वर्षापासून दुरावस्था झाली होती येथे घाणीचे साम्राज्य आणि दुर्गंधी मोठ्या प्रमाणावर निर्माण झाल्याने येथून निवडून आलेल्या नवनिर्वाचित नगरसेविका अफ्रीन आखवारे यांनी स्वखर्चाने तिथे भिंत बांधून चांगले काम केल्यामुळे येथील नागरिकांनी त्यांचे धन्यवाद मानले आहे.
सदर रस्त्यालगत गेले कित्येक वर्ष जिर्ण अवस्थेत असलेली मुतारी यामुळे येथे घाणीचे साम्राज्य तसेच रात्रीच्या सुमारास अनेक तळीराम येथे दारू पिऊन धिंगाणा घालत रस्त्यातून जात असताना येथील स्थानिक नागरिकांसह वाहन धारकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता या दुर्गंधीमुळे येथील असंख्य नागरिक त्रस्त झाले होते.त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला होता त्यामुळे या प्रभागातून निवडून आलेल्या नवनिर्वाचित नगरसेविका अफ्रीन आखवारे यांनी आपल्या स्वखर्चाने आज तातडीने सदर मुतारीच्या समोर भिंत उभी करून ती बंदिस्त केली असल्यामुळे येथील नागरिकांसह येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांनी नगरसेविका आफ्रीन अखवारे यांचे आभार मानले आहे.



Be First to Comment