
पनवेल (प्रतिनिधी ) : तायक्वॉन्डो फेडरेशन ऑफ इंडिया ही तायक्वॉन्डो खेळाची भारतातील एकमेव शिखर संघटना आहे. या संघटनेला इंडियन ऑलिंपिक व भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयाने मान्यता दिलेली राष्ट्रीय स्पर्धेचे बालयोगी इनडोअर स्टेडियम हैदराबादमध्ये यशस्वी आयोजन केले होते या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये रायगडचे खेळाडू प्राजक्ता अंकोलेकर , सेजल कानेकर , अनन्या चितळे व गायत्री भंडारे यांनी आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून कास्यपदक पदके पटकावली.
प्राजक्ता, सेजल, अनन्या , गयत्री या खेळाडूंना तायक्वॉन्डो चे प्रमुख प्रशिक्षक आंतरराष्ट्रीय पंच सुभाष पाटील यांनी मोलाचे मार्गदर्शन केले आहे गेली २० वर्षे सुभाष पाटील यांच्या कडे प्रशिक्षण घेत आहेत याचे तायक्वॅान्डो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व रायगड तायक्वॉन्डो असोसिएशन चे सर्व पदाधिकारी व इतर मान्यवरांनी अभिनंदन केले



Be First to Comment