

उरण – आवरे प्रतिनिधी( हिमांशू पटेल)
जे न देखे रवी ते देखे कवी कविता ही संकल्पना आहे तशी छान कविता ही एखाद्या प्रसंग मार्मिकपणे अगदी कमी वेळेत सांगू शकतो कविता हे समाजप्रबोधनाचे एक उत्कृष्ट माध्यम आहे यासाठी विद्यार्थ्यांना याविषयी व्यासपीठ मिळून तसेच विद्यार्थ्यांना कविते विषयी अधिक माहिती मिळावी यासाठी ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेच्या शिक्षकमित्र प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे कॉलेज ऑफ आर्टस, सायन्स अँड कॉमर्स – आवरे येथे कोकण मराठी साहित्य परिषद आयोजित कवी संमेलन मोठया उत्साहात संपन्न झाले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षकमित्र बाळासाहेब म्हात्रे कॉलेजचे प्राचार्य सुविद्य गावंड यांनी केले. कवी संमेलनात माजी प्राचार्य आर.के.म्हात्रे यांनी शिक्षण आणि आपली ध्येये या विषयावर मार्गदर्शन केले. जीवन सुखी व्हायचे असेल तर विद्यार्थ्यांनी आपल्या समोर ध्येय ठेवायला हवीत, असे विचार मांडले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यरत्न रायगडभूषण प्रा. एल.बी.पाटील होते.
येथे झालेल्या कोमसापच्या कविसंमेलनात कवयित्री अक्षता गोसावी यांनी कोलाहल मनातला कविता सादर करून सर्वांची मने जिकली. श्री. लवेंद्र मोकल यांनी दारूबंदी, श्री. संजीव पाटील यांनी आगरी पित्रा, श्री.रामचंद्र म्हात्रे यांनी जय जय उरण माझा या कविता सादर केल्या . तसेच प्रेमकाव्य ,निसर्गकाव्य, भावकाव्य ,विडंबनकाव्य इत्यादी प्रकारच्या कविता उत्स्पूर्त सादर केल्या या काव्य सादरीकरणाची प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी शीघ्र कविता सादर केल्या. कार्यक्रमात श्री.केशव म्हात्रे, श्री.संजय केणी, प्रा.प्रविण चिर्लेकर, श्री.शिवप्रताप पंडित, श्री.नरेश पाटील,,सौ. रंजना केणी आणि साहित्यरत्न प्रा.एल.बी.पाटील यांनी दर्जेदार कविता सादर करून रसिकांना मनसोक्त आनंद दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.रंजना जोशी केणी आणि प्रा.प्रविण चिर्लेकर यांनी केले. कवी संमेलन यशस्वी करण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सुभाष ठाकूर, शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्यानी विशेष परिश्रम घेतले. आभार प्रदर्शन प्रा.रोहिणी गोरे यांनी केले.



Be First to Comment