
ठाणे : प्रतिनिधी
गेल्या अनेक दिवसापासून ठाणे तिनहात नाका ते कशिश पार्क मुंबई मुलुंड पच्छिम चेक नाका कडे जाणारा हायवे व आग्रारोड जोड रस्त्यावर असलेले पेवर ब्लॉकचे स्पिड ब्रेकर खूप खराब व चुकीचे होते अपघाताला निमंत्रण व वाहनासही धोकादायक स्थितीत होते. नेहमीच विनाकारण वाहतुक खोळंबा व पाणी साचत होते तसेच प्रदृषण होत असे कारण स्पिड ब्रेकर वर खाली व खड्डेमय झालेले होते. साहजिकच वाहने दिम्यागतीने जात असत. अनेक सामाजिक कार्यकर्ता व श्री सतिश पाटील (मुंबई पत्रकार) यांना हा मुद्दा मार्गी लावून धरला होता. अखेर ठाणे महानगर पालिकेने उशीरा का होईना दखल घेऊन आता जुने धोकादायक स्पिडब्रेकर काढून त्या ठिकाणी नवीन डांबरी स्पिडब्रेकर बसवून वाहन चालकांना व जनतेला सुसाह्य सहकार्य केले.



Be First to Comment