

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाच्यावतीने तरुणांना प्राधान्य – जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण
पेण, दि. 15 ( प्रतिनिधी ) – : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात दररोज अनेक तरुणांचा प्रवेश होत असताना अलिबाग तालुक्यातील पळी येथे पक्षाच्या अलिबाग- मुरुड विधानसभा जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष म्हणाले की देशाचे नेतृत्व करणारे आपले नेते शरदचंद्र पवार यांनी आजवर राजकारणासह समाजकारणाला वाव दिली असून सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी या पक्षाचा केंद्रबिंदू ठरला आहे त्यामुळेच पवार साहेबांच्या विचारधारेवर आणि त्यांच्या नेतृत्वामुळे असंख्य कार्यकर्ते पक्षामध्ये प्रवेश करत आहेत त्यामुळे येथील तरुणांचा पक्षप्रवेश पाहता आजच्या अलिबाग मुरुड विधानसभा जनसंपर्क कार्यालयातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविले जातील अशी आशा व्यक्त करत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये तरुणांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी येथील असंख्य तरुणांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला त्यांचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षात स्वागत केले. या कार्यक्रमाला रायगड जिल्हाध्यक्ष रविंद्र चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष निलेश घरत, सचिव श्रीहर्ष कांबळे, महाड तालुकाध्यक्ष संदीप सकपाळ, रोहिदास चव्हाण, अलिबाग मुरुड विधानसभा सरचिटणीस साईनाथ म्हात्रे आदी उपस्थित होते.



Be First to Comment