

मनोज पाटील (प्रतिनिधी)
सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या कळंबोली येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वार्षिक अंतर कुल क्रीडा स्पर्धा व या विद्यालयाचा स्वप्नील किशोर लावंड या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला.
सुधागड माध्यमिक शाळा शाळांतर्गत व शाळाबाह्य विविध स्पर्धांमध्ये नेहमी अग्रेसर असते. या वर्षी सुधागड माध्यमिक शाळेचा विद्यार्थी कु. स्वप्नील किशोर लावंड या विद्यार्थ्यांने १४ वर्षाखालील ७५ किलो वजनी गटात सिंधुदुर्ग येथे झालेल्या महाराष्ट्र शासनाच्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून दिल्ली येथे होणार्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धसाठी निवड झाल्याबद्दल कळंबोली शहरात भव्य मिरवणूक काढून स्वप्नील लावंड चा शाल, श्रीफळ,सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देवून मान्यवरांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला.
या वेळी शाळेचे प्राचार्य राजेंद्र पालवे यांनी स्वप्नील च्या यशाबद्दल अभिमान व्यक्त करून त्याच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी शिवसेना जिल्हा पनवेल प्रमुख रामदास शेवाळे, माजी नगरसेवक विजय खानावकर, रविंद्र भगत,बबन मुकादम,विजया कदम,अजय सुर्यवंशी आदि मान्यवर उपस्थित होते.
या वेळी मान्यवरांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून वार्षिक अंतर कुल क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले.या सर्व स्पर्धांच्या यशस्वीतेसाठी शाळेचे प्राचार्य राजेंद्र पालवे, पर्यवेक्षक पुनम कांबळे, लक्ष्मण मगरे पाटील, भगवान खेडकर, क्रीडा शिक्षक विलास पाटील, विकास नाईक, फीरोज सय्यद, पियुष सदावर्ते तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी प्रयत्नशील आहेत.





Be First to Comment