
राज्यस्तरीय स्पर्धेत नेहाला चोरघेचा तिसरा क्रमांक – शाळेत आनंदाचा जल्लोष
क्रीडा शिक्षक कांतीलाल पाटील यांची नॅशनल कोच म्हणून निवड
पनवेल/ प्रतिनिधी
डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचालित बौद्धिक अक्षम मुलांच्या विशेष शाळेने क्रीडा क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. शाळेचे क्रीडा शिक्षक कांतीलाल पाटील यांची नुकतीच नॅशनल कोच म्हणून निवड झाली असून, बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांना सक्षम खेळाडू म्हणून घडविण्यात त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे.
अहमदनगर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय सायकलिंग स्पर्धेत शाळेतील विद्यार्थिनी एंजल पारचे हिने उत्कृष्ट कामगिरी करत नॅशनल सायकलिंग स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. तसेच या स्पर्धेत नेहाला चोरघे याने कठीण स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकवून शाळेच्या क्रीडा कामगिरीत भर घातली.
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार मारुती जाधव, संस्थेचे खजिनदार अतुल वाणी, सचिव सुरेश जाधव, तसेच सौ. श्रेया नंदकुमार जाधव यांनी विद्यार्थ्यांचे आणि क्रीडा शिक्षकांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या या कामगिरीनंतर शाळेतील सर्व कर्मचारी, पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





Be First to Comment