
पनवेल दि.१०(वार्ताहर): पनवेल शहरातील मिरची गल्ली येथील एका अर्थवट बांधकाम स्थितीत असलेल्या इमारतीला आग लागल्याची घटना आज घडली आहे.
शहरातील मिरची गल्लीच्या प्रवेशद्वाराजवळील आर्किड क्लिनिकच्या बाजूला असलेल्या अर्थवट बांधकाम स्थितीतील इमारतीमध्ये आज दुपारी अचानकपणे आग लागून येथे असलेल्या गवताने व प्लस्टिकने पेट घेतला. याबाबत परिसरातील जागृत नागरिकांना माहिती मिळताच त्यांनी त्वरित येथे जाऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान काहींनी तात्काळ पनवेल अग्निशामक दलाशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानुसार अग्निशामक दल घटनास्थळी दाखल होत त्यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. दरम्यान हा भाग दाटीवाटीच्या असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले असते तर मोठ्या प्रमाणात परिसराचे नुकसान झाले असते. यापूर्वीसुद्धा आ भागात अश्या प्रकारच्या आगीच्या घटना घडल्या आहेत.





Be First to Comment