Press "Enter" to skip to content

आगरी ग्रंथालय भेट : आगरी बोलीभाषा संवाद उपक्रम !

विद्यार्थ्यांना दिली अभ्यासक्रमातील आगरी साहित्यावर मार्गदर्शन,आगरी साहित्याची ओळख,आगरी साहित्य संदर्भात पुस्तकांची माहिती

मुंबई प्रतिनिधी : (सतीशपाटील)

ठाणे (कळवा)साळवी हाईस येथे वझे महाविद्यालय मुलुंड मधील 24 विद्यार्थी व 3 शिक्षक यांनी भेट दिली. अभ्यासक्रमातील आगरी साहित्यावर मार्गदर्शन,आगरी साहित्याची ओळख,आगरी साहित्य संदर्भात पुस्तकांची माहिती. उपस्थिती:प्रा.अरविंद जाधव सर (मुलुंड),रायगड भूषण प्रो. एल बी पाटील सर,श्री प्रकाश पाटील सर पनवेल, आगरी लोकगीत गायक दया नायक, प्रो. जयवंत पाटील सर,आगरी भाषा अभ्यासक मोरेश्वर पाटील,सुनील पाटील गुरुजी, मनोज साळवी, प्रो.मंजुळा पिंगळे,प्रो.निकिता माने, सतीश पाटील(मुंबई पत्रकार) वझे महाविद्यालय (मुलुंड) येथील मराठी विभागातील अरविंद जाधव यांच्या मार्गदर्शनात कळवा येथे आगरी ग्रंथालय आगरी बोलीभाषा ग्रंथ संवाद उपक्रम राबवण्यात आला.

सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व कविता सादर केल्या. प्रकाश पाटील सर यांनी बोली भाषेचे महत्व सांगितले “मी जर बोल्लू त माजा तोंड दिसते” या त्यांच्या कवितेने विद्यार्थ्यांना आगरी भाषेची खासियत अनुभवाला मिळाली याप्रसंगी आगरी साहित्य साहित्यिकांच्या पुस्तकांचे खास प्रदर्शन मानण्यात आले होते यावेळी आगरी ग्रंथालयाच्या दालनात आगरी बोलींतील सुप्रिसध्द ग्रंथांचे प्रदर्शन भरिवण्यात आले होते; त्यात आगरी साहीत्यावरील संशोधन ग्रंथांपासुन कथा,कविता, नाटक, आत्मकथने, वैचारिक तसेच ललीत लेखसंग्रह , आगरी बोली कोश, आगरी भाषा व्याकरण ,म्हणी वाक्प्रचार संग्रह , आगरी प्रकल्पग्रस्त समस्या यांवरील पुस्तके ही उपलब्ध होती. यावेळी
उपस्थितांच्या नोंदी, तसेच विद्यार्थी व शिक्षकांना आगरी बोलींची काही पुस्तके व विशेषांक भेट आयोजकांकडून आगरी बोलीभाषा,आगरी संस्कृती, आगरी परंपरा आदीबाबत तज्ञांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली.

युवा साहित्यिक सर्वेश तरे,कवी दया नाईक आगरी संस्कृती अभ्यासक मोरेश्वर पाटील, प्रकाश पाटील यांच्या प्रयत्नाने आगरी ग्रंथालय चळवळ सुरू आहे.अनेक ठिकाणी आगरी ग्रंथालय स्थापन करण्यात येत आहेत( डोंबिवली निळजे) येथे महिंद्र पाटीलसर आगरी ग्रंथालयाची व्यवस्था व्यवस्था पाहतात,(नेरळ) येथील आगरी ग्रंथालयची व्यवस्था कर्जत तालुका आगरी समाज संघटना पाहते, तर (कळवा) येथील “आगरी ग्रंथालय “ची व्यवस्था सामाजिक कार्यकर्ते मनोज साळवी पाहतात. सदर कार्यक्रमानंतर प्रो.अरविंद जाधव सर प्रतिक्रिया देताना म्हणाले की आमच्यासाठी आजचा दिवस अस्मरणीय होता. आमच्यासाठी आजचा दिवस अविस्मरणीय होता. आगरी साहित्यातील प्रतिभावतांना जवळून अनुभवता आले. आगरी ग्रंथालय संकल्पना मराठीतील अनेक बोलीतील प्रथम प्रयोगशाळा म्हणायला हवी,तिचे प्रारूप ‘आगरीशाला’ मराठी बोलीतील समृद्ध करणारी सदर चळवळ आहे याचा आनंद व अभिमान वाटतो.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.