
पनवेल दि. ०८ ( वार्ताहर ) : करंजाडे सेक्टर ३ येथे आज सकाळी ४ वर्षांपासून बेवारस पडलेल्या स्विफ्ट डिझायर आणि रिक्षाला आग लागली होती परंतु आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांच्या सावधानतेमुळे लगेचच अग्निशामक दलाला माहिती देऊन आग विझविण्यात आली.
प्रत्यक्षदर्शी साहेबराव दाते यांनी त्यांच्या घरातून अचानक लागलेल्या आगीची माहिती प्रथमेश पुंडे यांना दिली आणि अग्निशामक दलाच्या मदतीने आग विझविण्यात आली. अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी येऊन सदर आगेवर नियंत्रण मिळवले . गाडी मालकाचा शोध पोलीस करीत असून ही आग कशामुळे लागली असावी याचा शोध पोलीस करीत आहेत .




Be First to Comment