
कोण पटकावणार बहुमानाचा ‘अटल करंडक’ ?; महाराष्ट्राची उत्सुकता शिगेला
पनवेल(प्रतिनिधी) शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या १२ व्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीचा पारितोषिक वितरण समारंभ रविवार दिनांक ०७ डिसेंबरला सायंकाळी ०४ वाजता होणार असून यंदाचा बहुमानाचा राज्यस्तरीय अटल करंडक कोण पटकावणार? याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागली आहे.
महाअंतिम फेरीच्या पहिल्या दिवशी वसंतराव नाईक विज्ञान संस्था नागपूरची एकांकिका ‘वि. प्र’, मुलुंड वाणिज्य विद्यालय ‘स्वातंत्र्य सौभाग्य’, मिथक मुंबईची ‘कारण काय’, एकदम कडक नाट्य संस्था भाईंदरची ‘ बकेट लिस्ट’,, वि. ग. वझे विद्यालय मुलुंडची ‘द गर्दभ’, आर्टस कॉमर्स अँन्ड सायन्स कॉलेज साताराचे ‘सोयरीक’, नाट्य स्पर्श आणि भवन्स महाविद्यालय अंधेरीची ‘प्रतीक्षायान’, राजाराम बापू अभियांत्रिकी महाविद्यालय इस्लामपूरची ‘हाफ वे’, कलादर्पण पनवेलची ‘आख्यान- ए – झुरळ’, आणि रेवन एंटरटेनमेंट पुणेची ‘सांग रहियो’ या दहा एकांकिकांचे सादरीकरण होते. शनिवारी अभिनय नाट्यकला लोंढे चाळीसगावचची ‘गाईड’, नक्षत्र कला मंच मुंबई ‘स्पर्शाची गोष्ट’, नाट्यंकुर मुंबई ‘पाकिस्तानचे यान’, सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय ठाणे ‘थिम्मक्का’, साठे महाविद्यालय विलेपार्लेची ‘अमिग्डला’, अलडेल एज्युकेशन ट्रस्ट सन जॉन कॉलेज पालघर ‘हॅशटॅग इनोसंट’, कलांश थिएटर घाटकोपरची ‘मढ निघाले अनुदानाला’, कलाकार मंडळी पुणे ‘नाटेक’, मॉडर्न महाविदयालय गणेश खिंड पुणेची ‘वामन आख्यान’, स्वभाव कल्याण ‘श्री गणेशा’ बाबी अमर हिंद मंडळ दादरची ‘रेशनकार्ड’ या एकांकिकांचे सादरीकरण होते. तर अंतिम दिवशी म्हणजे रविवारी रंग पंढरी पुणेची ‘बरड’, नाट्यऋणी आणि विवेक वाणिज्य महाविद्यालय गोरगावची ‘शपथ घेतो की’, सीकेटी ठाकूर स्वायत्त महाविद्यालय नवीन पनवेलची ‘कीचकवध’ आणि डॉक्टर ग्रुप बीएमसी हॉस्पिटल मुंबईची ‘सपान’ या एकांकिका सादर होणार आहे. राज्यभरातील १०० हून अधिक एकांकिकांमधून निवड झालेल्या २५ दर्जेदार एकांकिकांमध्ये रोमांचक स्पर्धा रंगली आहे. त्यामुळे यंदाचा अटल करंडक कोण जिंकणार याची उत्सुकता अवघ्या महाराष्ट्राला लागली आहे.





Be First to Comment