

रॅलीमध्ये सुमारे 150 विद्यार्थी, पालक, शिक्षक व संस्थेचे सभासद सहभागी
पनलेल (प्रतिनिधी) ः 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनाच्या अनुषंगाने दि.5 डिसेंबर 2025 रोजी रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाउन चॅरिटेबल ट्रस्ट संचलित श्रीमती राधाबाई खेमचंद परमार रोटरी कर्णबधीर मुलांच्या विशेष शाळेतर्फे नवीन पनवेल परिसरात दिव्यांग जनजागृती रॅली आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत दिव्यांग जनजागृतीचे तयार केलेले संदेश, फलक आणि घोषवाक्य हे रॅलीचे विशेष आकर्षण ठरले.
या जनजागृती रॅलीची सुरुवात शाळेच्या आवारातून झाली. शिक्षक व पालकांच्या सहकार्याने कर्णबधिर विद्यार्थी समान संधी -समान हक्क, सुलभ सुविधा हा प्रत्येकाचा अधिकार यांसारखे संदेश देत नागरिकांशी संवाद साधत होते. या रॅली मध्ये विद्यार्थ्यांनी ठराविक अंतरावर लेझीम नृत्य सादर केले. रॅलीमध्ये सुमारे 150 विद्यार्थी, पालक, शिक्षक व संस्थेचे सभासद सहभागी झाले होते.
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्षमतांना योग्य वाव मिळाल्यास ते समाजातील विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी करू शकतात-अशा रॅलीमुळे समाजात सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होण्यास मदत होते. त्यामुळे दरवर्षी शाळेतर्फे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या रॅलीचे आयोजन करण्यात येत असते.
संस्थेचे सदस्य चारुदत्त भगत यांनी रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सर्वांना फ्रुटीचे वाटप केले. तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा पनवेल यांच्यातर्फे रॅली मधील सहभागी विद्यार्थ्यांना कॅडबरी व पाणी बॉटलचे वाटप करण्यात आले. नवीन पनवेल परिसरात काढण्यात आलेल्या या दिव्यांग जनजागृती रॅलीचा समारोप शाळेत झाला.
या रॅलीमध्ये संस्थेचे चेअरमन अरविंद सावळेकर, सचिव प्रमोद वालेकर, चारुदत्त भगत, राजेंद्र ठाकरे, कल्पेश परमार, निलेश पोटे, अॅड. हितेश राजपूत, सुधीर कांडपिळे, प्रकाश शृंगारपुरे आणि शाळेच्या मुख्याध्यापिका शैला बंदसोडे आदि सहभागी झाले होते.






Be First to Comment