
सुप्रसिद्ध अभिनेते डॉ. गिरीश ओक, सुनील तावडे आणि प्रतिमा कुलकर्णी यांच्याहस्ते सोहळ्याचे उद्घाटन
पनवेल (प्रतिनिधी) श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी प्रमाणे यंदाही आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय ‘अटल करंडक’ एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरी सोहळ्याचे उद्घाटन पनवेलमधील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सुप्रसिद्ध अभिनेते गिरीश ओक, सुप्रसिद्ध दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी, सुप्रसिद्ध अभिनेते सुनील तावडे यांच्या हस्ते आज (दि. ०५) शानदारपणे झाले. तीन दिवस चालणाऱ्या या महाअंतिम फेरीत राज्यभरातून १०० हुन अधिक एकांकिकांमधून निवड झालेल्या उत्कृष्ट २५ एकांकिका सादर होणार असून नाट्य रसिकांना मोठी मेजवानी मिळाली असून विशेष म्हणजे या सोहळ्याला युवा ते ज्येष्ठ नाट्य रसिकांची मोठी गर्दी पहायला मिळाली.
१२ व्या पर्वाच्या या सोहळयाच्या प्रारंभाला प्रमुख मान्यवर म्हणून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा उपाध्यक्ष व स्पर्धा प्रमुख आणि पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, माजी शहर अध्यक्ष जयंत पगडे, माजी नगरसेवक अनिल भगत, अजय बहिरा, राजू सोनी, महिला मोर्चाच्या शहर अध्यक्षा रुचिता लोंढे, माजी नगरसेविका दर्शना भोईर, सुरेखा मोहोकर, प्रीती जॉर्ज, सुरेखा कल्याणकर, नलिनी शेलार, सिद्धीका पुंजानी, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे, सुप्रसिद्ध अभिनेता भरत सावले, अभिनेते व दिग्दर्शक राजा अत्रे, सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. पाटील, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे संचालक संजय भगत, शहर सरचिटणीस अमित ओझे, प्रीतम म्हात्रे, रुपेश नागवेकर, जिल्हा उपाध्यक्ष मयुरेश नेतकर, संजय जैन, पवन सोनी, पनवेल शहर युवा मोर्चाचे शहराध्यक्ष हिमेश बहिरा, आरती तायडे, मनिषा बहिरा तसेच कार्यवाह श्यामनाथ पुंडे, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, चिन्मय समेळ, अमोल खेर, गणेश जगताप, वैभव बुवा आदी उपस्थित होते.
महाअंतिम फेरीच्या पहिल्या दिवशी वसंतराव नाईक विज्ञान संस्था नागपूरची एकांकिका ‘वि. प्र’, मुलुंड वाणिज्य विद्यालय ‘स्वातंत्र्य सौभाग्य’, मिथक मुंबईची ‘कारण काय’, एकदम कडक नाट्य संस्था भाईंदरची ‘ बकेट लिस्ट’,, वि. ग. वझे विद्यालय मुलुंडची ‘द गर्दभ’, आर्टस कॉमर्स अँन्ड सायन्स कॉलेज साताराचे ‘सोयरीक’, नाट्य स्पर्श आणि भवन्स महाविद्यालय अंधेरीची ‘प्रतीक्षायान’, राजाराम बापू अभियांत्रिकी महाविद्यालय इस्लामपूरची ‘हाफ वे’, कलादर्पण पनवेलची ‘आख्यान- ए – झुरळ’, आणि रेवन एंटरटेनमेंट पुणेची ‘सांग रहियो’ या दहा एकांकिकांचे सादरीकरण होते. उर्वरित १५ एकांकिका शनिवार व रविवारी सादर होणार आहेत. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ ०७ डिसेंबर रोजी होणार असून स्पर्धेतील विजेत्या एकांकिकेला ०१ लाख रूपये आणि मानाचा ‘अटल करंडक’ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच ज्येष्ठ रंगकर्मी नीना कुलकर्णी आणि सुप्रसिद्ध अभिनेते व निर्माता सुनिल बर्वे यांचा “गौरव रंगभूमीचा” पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रात नाटय चळवळ एक मोठी परंपरा आहे. नाट्य क्षेत्रातून कलाकार घडत असतात. त्या अनुषंगाने हि परंपरा कायम रहावी आणि नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळावा, त्यांनी आपल्या अंगी असलेले कौशल्य सादर करून या क्षेत्रात उज्वल कामगिरी करावी हा कायम उद्देश अटल करंडकचा राहिला आहे. ही स्पर्धा जरी डिसेंबर महिन्यात होत असली तरी तयारी मात्र मे महिन्यापासून सुरु होत असते. तपशीलवार चर्चा आणि ज्येष्ठांचे मार्गदर्शन घेऊन नियोजन केले जाते. हे करंडक सर्वांच्या सहकार्य आणि मेहनतीने यशस्वी होत असते, त्यामुळे दमदारपणे १२ व्या पर्वात पाऊल टाकले आहे. सांस्कृतिक क्षेत्राची पनवेलची पाळेमुळे घट्ट आहेत आणि ती अधिक वृद्धिंगत व्हावा, यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहणार आहोत.
– परेश ठाकूर- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा उपाध्यक्ष व स्पर्धा प्रमुख



Be First to Comment