
तृतीयपंथींवर कारवाईची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षा तर्फे मागणी
पनवेल दि.०५(वार्ताहर): १ डिसेंबर रोजी तृतीय पंथीयांसोबत झालेल्या वादावादीतून स्कुटी वरून आलेल्या दोघांनी ३७ वर्षीय तरुणाची हत्या केली होती. पोलिसांनी वेळीच तृतीय पंथीयांवर कारवाई केली असती तर या तरुणाचे प्राण वाचले असते. याच पार्श्वभूमीवर कामोठे टोल नाका ते खारघर टोल नाक्याच्या दरम्यान हायवेवर उभ्या असलेल्या तृतीय पंथीयांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पनवेल विधानसभा समन्वयक प्रदीप केसरीनाथ ठाकूर यांनी कळंबोली पोलिसांकडे पत्राद्वारे केली आहे.
सायन -पनवेल महामार्गावरील कामोठे टोल नाका ते खारघर टोल नाकाच्या दरम्यान हायवेवर उड्डाणपुलाच्या बाजूला रात्री आठनंतर तृतीयपंथी रस्त्यावर उभे राहतात आणि ते अश्लील वर्तन असल्याने त्याचा त्रास येणाऱ्या जाणाऱ्यांना होतो. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तवणूक करणाऱ्या तृतीयपंथीयांचा बंदोबस्त करावा अशी मागणी प्रदीप ठाकूर यांनी पोलिसांकडे केली.



Be First to Comment