Press "Enter" to skip to content

१५० हून अधिक बिल्डर्स, आर्किटेक्ट्स आणि उद्योग तज्ज्ञांनी उपस्थिती

क्रेडाई एमसीएचआय रायगड आणि क्रेडाई एमसीएचआय युथ बिल्डर्स असोसिएशन यांच्यावतीने बीज कनेक्ट कार्यक्रमाचे आयोजन

पनवेल दि.०५(वार्ताहर): क्रेडाई एमसीएचआय रायगड आणि क्रेडाई एमसीएचआय युथ बिल्डर्स असोसिएशन यांच्या संयुक्त ताज विवांता, तुर्भे, नवी मुंबई येथे बीज कनेक्ट हे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात क्रेडाई एमसीएचआय रायगड युनिटचे अध्यक्ष अरविंद एम. सावळेकर यांच्या हार्दिक स्वागताने झाली. आपल्या मनोगतात त्यांनी या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश म्हणजे डेव्हलपर्स आणि बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स यांच्यात थेट संवादाची निर्माण केलेली संधी, रिअल इस्टेट क्षेत्रातील नवीन व नाविन्यपूर्ण उत्पादने व तंत्रज्ञानाची ओळख, तसेच अधिक सशक्त व्यावसायिक संबंध प्रस्थापित करणे हे असल्याचे सांगितले. कार्यक्रमाला प्रचंड उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळाला असून नवी मुंबई आणि रायगड परिसरातील विक्रेते व डेव्हलपर्स यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविला.

विविध श्रेणीतील सुमारे २० प्रतिष्ठित विक्रेत्यांनी या एक्स्पोमध्ये आपली उत्पादने सादर केली. कार्यक्रमाचे “Powered By Sponsor” असलेल्या SB Formwork यांच्याकडून विशेष प्रेझेंटेशन देण्यात आले. या कार्यक्रमाला १५० हून अधिक बिल्डर्स, आर्किटेक्ट्स आणि उद्योग तज्ज्ञांनी उपस्थित राहून संपूर्ण संध्याकाळ फलदायी B2B चर्चा केल्या. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून क्रेडाई एमसीएचआयचे सचिव रुशी मेहता, तर मान्यवर पाहुणे म्हणून क्रेडाई एमसीएचआय चे COO केवल वलांभिया उपस्थित होते. दोन्ही मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक केले तसेच भविष्यातही अशा परिणामकारक व सहकार्य वाढविणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी क्रेडाई एमसीएचआय रायगड आणि युथ टीमला प्रोत्साहन दिले. नवी मुंबई आणि रायगड येथील इतर बिल्डर्स असोसिएशन्सचे पदाधिकारी—विशेषतः क्रेडाई एमसीएचआय नवी मुंबई, CREDAI BANM, BANM रायगड, CREDAI ड्रोनागिरी आणि MHBA—यांनीही आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवली.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सेक्रेटरी राकेश प्रजापती, कार्यक्रम संयोजक वैभव अग्रवाल, युथ अध्यक्ष जितेश अग्रवाल आणि सेक्रेटरी अशियान खोत तसेच महेश नागराजन, प्रशांत शेवडे, प्रिया गुरनानी, प्रतीक पोटे, आकाश मोरे, तेजस पाटील, अनिरुद्ध सावळेकर, रिषभ प्रजापती आणि क्रेडाई एमसीएचआय रायगड व युथ टीमच्या सर्व सदस्यांनी सक्रिय सहभाग घेतला . कार्यक्रमाची सुरवात राष्ट्रगीताने झाली, त्यानंतर आयोजित भव्य डिनरसह हा प्रभावी आणि समृद्ध उद्योग-नेटवर्किंग कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.