
सिन्नर (प्रतिनिधी) विद्यार्थ्यांसाठी उत्तम शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या आपल्या सामाजिक बांधिलकीतून थोर देणगीदार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सिन्नर तालुक्यातील दोन शैक्षणिक संस्थांसाठी एकूण ३५ लाख रुपयांची देणगी दिली आहे.
रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य रामशेठ ठाकूर यांनी ठाणगाव येथील पुंजाजी रामजी भोर विद्यालय आणि डॉ. अण्णासाहेब शिंदे कनिष्ठ महाविद्यालय या संस्थांसाठी नवीन इमारत बांधकामासाठी २५ लाख रुपये तर सिन्नर तालुक्यातील पांगरी येथील श्री संत हरीबाबा विद्यालयसाठी १० लाख रुपये इतकी देणगी प्रदान केली आहे.
ही देणगी ठाकूर इन्फ्रा प्रोजेक्ट्स यांच्या सीएसआर फंडातून करण्यात आली असून, बुधवारी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते धनादेश विद्यार्थ्यांच्या हितासाठी संस्थांना दिला गेला. यावेळी पुंजाजी रामजी भोर विद्यालयाचे मुख्याध्यापक काशिनाथ लक्ष्मण तळपाडे आणि डॉ. अण्णासाहेब शिंदे कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र चंद्रभान काकड उपस्थित होते.लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या या उदार योगदानामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी आधुनिक आणि सुसज्ज इमारतींमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण घेऊ शकणार आहेत, जे त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मोलाची पायाभूत सुविधा ठरेल.





Be First to Comment