Press "Enter" to skip to content

HIV / AIDS आजाराबद्दल जनजागृती रॅली

इंटरनॅशनल एड्स सप्ताहाच्या निमित्ताने कळंबोली व पनवेल येथे भव्य रॅलीचे आयोजन

पनवेल : प्रतिनिधी

कै. आबासाहेब उत्तमराव बेडसे सेवाभावी संस्थेचे लाईफ लाईन स्कूल ऑफ नर्सिंग, सुशीला नर्सिंग कॉलेज, पनवेल व डॉ. जयश्री पाटील इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग यांनी रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाउन आणि उपजिल्हा रुग्णालय, पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने इंटरनॅशनल एड्स सप्ताहाच्या निमित्ताने दिनांक 1 डिसेंबर 2025 रोजी कळंबोली येथे तर 3 डिसेंबर 2025 रोजी पनवेल येथे भव्य रॅलीचे आयोजन केले.

सदर कार्यक्रमासाठी माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली, त्यावेळी लाईफ लाईन हॉस्पीटलचे चेअरमन डॉ. प्रकाश पाटील, डायरेक्टर्स डॉ. जयश्री पाटील, डॉ. अभितेज म्हस्के, डॉ. केतकी पाटील म्हस्के, डॉ. अजिंक्य पाटील व डॉ.जान्हवी पाटील तसेच रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाउन चे अध्यक्ष रोटरीयन श्री निलेश पोटे, सेक्रेटरी रोटरीयन ॲड.हितेश रजपूत, पूर्व अध्यक्ष रोटरीयन श्री. व्ही. सी. म्हात्रे, पूर्व अध्यक्ष रोटरीयन श्री. कल्पेश परमार, पूर्व अध्यक्ष रोटरीयन श्री. चारुदत्त भगत, रोटरीयन श्री. संजय जैन, रोटरीयन श्री. तुषार तटकरी, रोटरीयन सौ. कल्पना नागांवकर, रोटरीयन सौ. बसंती जैन, रोटरीयन ॲड. दिपाली व्होरा, श्री. केदार भगत उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी पनवेल शहर मंडळ, लाईफ लाईन हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. गौरी शिवानी, श्री. महेंद्र उरणकर, श्री. राजेश भूषण व लाईफ लाईन हॉस्पिटलचे कर्मचारीवृंद उपस्थित होते.

माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर व इतर मान्यवरांच्यासमोर नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी HIV / AIDS आजाराबद्दल जनजागृती करणारे पथनाट्य सादर केले. आमदार प्रशांतदादा ठाकूर व डॉ. प्रकाश पाटील यांनी मार्गदर्शनपर भाषण केले. माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर यांनी रॅलीचे उद्घाटन केले त्यानंतर रॅली लाईफ लाईन हॉस्पीटलपासून छत्रपती शिवाजी महाराज मार्ग लाईन आळी, जयभारत नाका मार्गे उपजिल्हा रुग्णालय येथे पोहोचली, तेथे विद्यर्थ्यांनी पथनाट्य सादर केले. तेथे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिवाजी पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. ईटकरे, डॉ. राठोड, समुपदेशक श्री. विकास कोमपले व उपजिल्हा रुग्णालयाचे कर्मचारी उपस्थित होते. नंतर रॅली पनवेल महानगरपालिका, सावरकर चौक, यूपीएससी गावदेवी मंदिरामार्गे लाईफ लाईन हॉस्पिटल येथे पोहोचून तेथे त्या रॅलीचा समारोप करण्यात आला.

सदर कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल आमदारांनी लाईफ लाईन हॉस्पीटल च्या डायरेक्टर डॉ. जयश्री पाटील यांचे आभार मानले व नर्सिंगच्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले .

या कार्यक्रमाला नर्सिंगच्या प्राचार्या डॉ. सुपर्णा सुनील पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तसेच हा कार्यक्रम पार पाडण्यास शिक्षकवृंद व इतर कर्मचारी यांचे सहकार्य होते.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.