
पनवेल(प्रतिनिधी) ‘वन वर्ल्ड वुमेन नेटवर्क’ या संस्थेद्वारे आयोजित ‘निर्भय नेतृत्व’ या महत्त्वपूर्ण कार्यक्रमासाठी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स (अधिकार प्रदत्त स्वायत्त) महाविद्यालयाने ‘शैक्षणिक भागीदार’ म्हणून सहभाग घेतला.
या कार्यक्रमाचे आयोजन श्रीमती अंशुल शर्मा, श्रीमती जयश्री काटकर, श्रीमती गरिमा शर्मा, डॉ. स्वाती पडोशी आणि डॉ. अनुरिता गौतम यांनी केले होते. या प्रेरणादायी कार्यक्रमाला देशातील पहिल्या महिला आयपीएस अधिकारी डॉ. किरण बेदी यांची ‘प्रमुख अतिथी’ म्हणून विशेष उपस्थिती लाभली. महाविद्यालयाचे विद्यार्थी परिषद, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना आणि प्लेसमेंट सेल क्लबचे असे एकूण ७० विद्यार्थी या सत्रात सहभागी झाले होते.
या कार्यक्रमादरम्यान सीकेटी महाविद्यालयाचा विशेष सत्कार करण्यात आला. डॉ. किरण बेदी यांच्या हस्ते महाविद्यालयाला सन्मानपत्र प्रदान करण्यात आले, जो संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारा क्षण होता. महाविद्यालयीन स्तरावर हे सन्मानपत्र महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. एस. के. पाटील आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रो. डॉ. बी. डी. आघाव यांच्या मार्गदर्शनाने प्राप्त झाले. प्लेसमेंट सेलचे अध्यक्ष प्रो. सत्यजित कांबळे यांनी महाविद्यालयाच्या वतीने हे सन्मानपत्र स्वीकारले.या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात प्लेसमेंट सेल विभागाचे अध्यक्ष प्रो. सत्यजित कांबळे, विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष डॉ. सूर्यकांत परकाळे, लेफ्टनंट नीलिमा तिदार , प्रशिक्षण आणि प्लेसमेंट अधिकारी श्रीमती आरती कागवाडे, प्लेसमेंट समन्वयक श्रीमती श्रुती कोळी, राष्ट्रीय सेवा योजनेचे मुख्य कार्यक्रम अधिकारी श्री. आकाश पाटील, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी श्री. रूपेश माने आणि प्लेसमेंट अधिकारी कौस्तुभ सोमण यांनी सक्रिय सहभाग घेतला. महाविद्यालयाला मिळालेला ‘शैक्षणिक भागीदार’चा हा सन्मान संस्थेच्या शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांमधील योगदानाची निश्चितच ग्वाही देतो.





Be First to Comment