
खासदार निधीतून रंगमंचाची उभारणी खा. संजय दिना पाटील यांचा पुढाकार
मुंबई, प्रतिनीधी: (सतिश पाटील)
भांडुप, कांजुरमार्ग तसेच स्थानिक नाट्य कलाकारांना आता भांडुप मध्येच नाट्यगृह मिळणार आहे. स्व. दिना बामा पाटील रंगमंचाचे विस्तारीकरण करण्यात आल्याने या ठिकाणी नाटकांची तालीम, सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम करण्यासाठी मोठा रंगमंच उपलब्ध झाला आहे. ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांच्या खासदार निधीतून या रंगमंचाचे काम करण्यात आले आहे.

भांडुप गाव येथे सार्वजनिक पूजा समितीचे स्व. दिना बामा पाटील रंगमंच सभागृहाचे विस्तारीकरण करण्याची मागणी खा. संजय दिना पाटील यांच्याकडे करण्यात आली होती. स्थानिक नाट्य कलाकारांना तालमीसाठी रंगमंच उपलब्ध नसल्याने त्यांना शिवडी किंवा दादर या ठिकाणी जावे लागत असल्यामुळे त्यांच्यावर आर्थिक ताण पडत होता. शिवाय सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमासाठी मंचाची जागा अपुरी पडत होती. ही बाब लक्षात घेऊन खासदार संजय दिना पाटील यांनी खासदार निधीतून या रंगमंचाचे काम करण्यात आले.
रंगमंचाच्या विस्तारीकरणामुळे भांडुपकरांना सर्व प्रकारचे कार्यक्रम करण्यासाठी आता मोठा मंच उपलब्ध झाला असून शिवसेना उबाठा गटाचे आमदार सुनिल राऊत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती खासदार संजय दिना पाटील, विभाग प्रमुख रमेश कोरगावकर व सार्वजनिक पुजा समिती अध्यक्ष परशुराम कोपरकर, माजी नगरसेवक धनंजय पिसाळ तसेच युवासेना कार्यकारणी सदस्य राजोल संजय पाटील उपस्थित होते. यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तसेच किल्ला बांधणी स्पर्धांमध्ये प्रथम, व्दितीय आलेल्या स्पर्धकांना पारितोषिक देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.





Be First to Comment