
आवरे : प्रशांत म्हात्रे
जागतिक एड्स दिन, दरवर्षी 1 डिसेंबर रोजी साजरा केला जातो, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) प्रथम 1988 मध्ये HIV/AIDS महामारीवर जागतिक लक्ष केंद्रित करण्यासाठी, जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि एड्समुळे मृत्यू झालेल्यांचा सन्मान करण्यासाठी स्थापना केली होती.या या रोगाचे गांभीर्य लक्षात घेता जनमानसामध्ये प्रबोधन व्हावे याकरिता शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून पथनाट्यद्वारे जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूल आवरे मध्ये या रोग विषयक जनजागृती असा उपक्रम आखण्यात आला.
अतिशय सुंदर पद्धतीने विद्यार्थ्यांनी नाटिका तयार करून पथनाट्ये या द्वारें एड्स या रोगावर लोकहीतपर संदेश जो आहे तो समस्त सामाजिक माध्यमातून सर्वाना दिला अशाप्रकारे जागतिक एड्स दिन जानकीबाई जनार्दन ठाकूर माध्यमिक विद्यालय आवरे यामध्ये जनजागृती करुन साजरा करण्यात आला यामध्ये उत्स्फूर्त असा प्रसिद्ध प्रतिसाद विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विद्यालयाच्या मुख्याद्यापीका सौ निकिता म्हात्रे तसेच सहकारी शिक्षक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी यांनी घेतला सदर समाजप्रबोधनपर हा उपक्रम विद्यालयात राबविल्या बद्दल संस्थेचे सचिव श्री वामन ठाकूर सौ अलका ठाकूर सिंधू ठाकूर प्रसाद ठाकूर आदिनाथ ठाकूर प्रतीक ठाकूर रीना ठाकूर यांनी सर्वांचे गोड कौतुक केले आहे





Be First to Comment