
पेण, दि. 1 ( वार्ताहर ) : मागील १५ वर्षांपूर्वी पेण अर्बन बँकेत कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार करून ठेवीदारांना वाऱ्यावर सोडणाऱ्या शिशिर धारकरला पेणच्या निवडणुकी सुज्ञ नागरिकांनी मतदान करू नये असे आवाहन प्रसिद्ध उद्योजक भरत पूनमिया यांनी आज सोमवार रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले आहे.
पेण नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर सभेत त्यांनी सांगितले की आपण सहा महिन्यात ठेवीदारांना न्याय देऊ शकतो परंतु हे मूर्ख बनविण्याचे लक्षणे आहेत.ठेवीदारांच्या कष्टाच्या पैशातून सहाशे कोटी रुपयांची मालमत्ता खरेदी केली असता आज तीची मार्केट भावाप्रमाणे किंमत तीन हजार कोटीहून अधिक झाली आहे.त्यामुळे देवीदारांना स्वतःच्या पैशाच्या दुपटीने पैसे देणे आजच्या घडीला गरजेचे आहे.
२०२४ रोजी सहकार खात्याने बँकेच्या संबंधित संचालकांकडून प्रत्येकी २४ कोटी रुपये भरण्याची नोटीस काढली आहे परंतु यातून ठेवीदारांचे पैसे वसूल होणार नाहीत उलट त्यावरील व्याज आकारणी होऊन पैसे वसूल होणे आवश्यक आहे.सदर बँकेत जैन समाजाचे १ कोटी ३३ लाख रुपये अडकले असून पंधरा वर्षाच्या व्याजासह आज ती रक्कम आठ ते दहा कोटी रुपये होत आहे.जैन समाजाला त्यांच्या हक्काचे पैसे मिळालेच पाहिजे हाच उद्देश आपला आहे.त्यामुळे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी या प्रकरणात अधिक लक्ष घालून ठेवीदारांना न्याय द्यावा तसेच मला या प्रशासकीय मंडळात घेतले तर मी या सर्व जागा विकून ठेविदारांना जास्तीचे पैसे देऊ शकतो मी बिल्डर असल्यामुळे या गोष्टींची पूर्णतः माहिती आहे.त्यामुळे बँक बुडवून ठेवीदारांना वाऱ्यावर सोडणाऱ्या अशा भ्रष्टाचारी माणसाला मतदान न करण्याचे आवाहन त्यांनी पत्रकार परिषदेत शेवटी केले.





Be First to Comment