

दीपक फर्टिलायझर्स च्या सीएसआर उपक्रमांतर्गत, ईशान्य फाउंडेशनच्या माध्यमातून कृषी आधारित उपजीविका (वाडी) प्रकल्पामुळे पनवेल तालुक्यातील २८ गावे आणि ११ पाड्यांतील लहान, अल्पभूधारक आणिआदिवासी शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन
पनवेल(प्रतिनिधी) तळोजा औद्योगिक क्षेत्रातील दीपक फर्टिलायझर्स अँड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी आपल्या सीएसआर उपक्रमांतर्गत, ईशान्य फाउंडेशनच्या माध्यमातून २०१३ पासून राबवत असलेल्या कृषी आधारित उपजीविका (वाडी) प्रकल्पामुळे पनवेल तालुक्यातील २८ गावे आणि ११ पाड्यांतील लहान, अल्पभूधारक आणिआदिवासी शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन होत आहे.पडीक जमिनीला फळबाग आणि भाजीपाला उत्पादनक्षम शेतात रूपांतरित करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या वाडी मॉडेलमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास, हंगामी स्थलांतर कमी होण्यास आणि हवामानाशी जुळवून घेणारी शेती करण्यास मदत होते.
पडीक जमिनीपासून समृद्धीकडे या उपक्रमांतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्याकडे अर्धा एकर क्षेत्रावर आंबा फळ बाग लागवडीबरोबर, कुंपणासाठी वनीकरणानाची झाडे, भाजीपाला लागवडीसाठी मदत व प्रोहत्सान दिले जात आहे. तसेच शेतकऱ्यांना मृद व जलसंधारणाचे प्रशिक्षण, ठिबक सिंचन, आणि चांगल्या दर्जाचे बियाणे व खत यासाठी मदत दिली जाते आहे. जमिनीचे वेगाने होणारे तुकडीकरण आणि अधिक उत्पादनाची गरज लक्षात घेऊन, दीपक फर्टिलायझर्सने उच्च घनतेची लागवड पद्धत पद्धतीने सुरू केली आहे. या पद्धतीत फक्त ५गुंठ्यात ५० केशर जातीची आंब्याची रोपे लावली जातात. त्यामुळे जागेचा जास्त उपयोग होतो, फळधारणा लवकर सुरू होते, कीड रोगनियंत्रण सोपे होते आणि उत्पादनात मोठी वाढ होते. आतापर्यंतचे प्रकल्पातील महत्त्वपूर्ण यश म्हणजे ४३० शेतकऱ्यांकडे आंबाफळ बाग विकसित; तसेच भाजीपाला लागवड सुरू, ८४.६% वाड्यांमध्ये फळधारणा, ३८० वाड्यांमध्ये फळधारणा झाली असून २०२४-२५मध्ये ३८,८३९किलोआंबा उत्पादनातून ३४.५६लाख रुपये उत्पन्न, ५५०शेतकऱ्यांनाभाजीपालालागवडीसाठीसहाय्य;सरासरीवार्षिकउत्पन्न ७५,८३३पर्यंतवाढ, ७७३.२५एकर क्षेत्रावर शाश्वत शेती सुरू झाली असून ७३% कुटुंबांचे हंगामी स्थलांतर कमी झाले किंवा थांबवले आहे.
यशाच्या प्रेरणादायी कथा
“आता आम्हाला खरंच दिलासा मिळतो,” असे भल्याचीवाडी, तळोजा येथील चंद्रा आणि विकास निरगुडा सांगतात. सहा महिन्याच्या बाळासह फक्त दोन एकर शेतीवरअनियमित पाण्याच्या पुरवठ्यामुळे ते सतत अडचणीत होते. दीपक फर्टिलायझर्सच्या पाणी संसाधन विकास उपक्रमांतर्गत त्यांनी २ एचपी सबमर्सिबल पंप बसवला. यामुळे शेताला शाश्वत पाणी पुरवठा होत आहे.
या हंगामात त्यांनी काकडी, कारले आणि चौळीची लागवड करून ५७ हजार ५०० इतकेआतापर्यंतचे सर्वाधिक हंगामी उत्पन्न मिळवले. पहिल्यांदाच आमच्या मुलाच्या भविष्याबद्दल सुरक्षित वाटत आहे, असेचंद्रा सांगतात. आमच्या नातवांनाही आता पुढे शिकायची स्वप्ने दिसू लागली आहेत,” असे गाढेश्वर येथील महादी आणि दत्तू दुमणे सांगतात. २.५ एकरशेती असलेल्या या दांपत्याला वाडी प्रकल्पांतर्गत सहाय्य मिळाले. सुधारित पद्धतींमुळे त्यांनी काकडी आणि चौळीचे उत्पादन घेऊन २३ हजार २० रुपये मिळवले, तसेच आंबा विक्रीतूनअतिरिक्त ५५ हजार ९०० रुपये उत्पन्नमिळाले. “पूर्वी आम्ही मजुरीवर अवलंबून होतो; आता आमची शेतीच आमची सोय करते, असे दत्तू सांगतात.
दीपक फर्टिलायझर्सच्या कसर उपक्रमांतर्गत आम्ही शाश्वत शेतीला ग्रामीण सक्षमीकरणाचा मजबूत पाया मानतो. वाडी उपक्रमाने तंत्रज्ञानाधारित शेती, सततचे मार्गदर्शन आणि हाय-डेन्सिटी प्लांटेशनसारख्या आधुनिक फळबाग लागवड पद्धतींच्या माध्यमातून जमिनीपासून कुटुंबांपर्यंत बदल घडवता येतो, हे प्रभावीपणे दाखवून दिले आहे. ईशान्य फाउंडेशनचे आदिवासी भागात शाश्वत प्रगतीचा पाया रचत आहे,हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता वाढवत आहे आणि शेतकरी कुटुंबांना सन्मान व आत्मविश्वास देत आहे.
नरेश पिनिसिटी, अध्यक्ष – कॉर्पोरेट गव्हर्नन्स, दीपक फर्टिलायझर्स





Be First to Comment