
पेण, ता. २९ (वार्ताहर) : पेण तालुक्यातील धावटे परिसरात असणाऱ्या स्पाईस हॉटेलवर अवैधरित्या दारुचा गुत्ता चालविला जात असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संदीप बागुल यांना मिळाली असता त्यांनी दि.२९ रोजी दुपारच्या सुमारास त्या ठिकाणी जाऊन कारवाई केली या कारवाईत अनेक जण तिथे अवैधपणे दारुचे सेवन करत असल्याचे आढळून आले तर जागेवर दारुच्या बाटल्या, चाकणा व इतर साहित्य असे एकूण ७ हजार १७० रुपयांचा माल जप्त केला आहे.
रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी संपूर्ण रायगड मध्ये अवैध्यरित्या सुरू असलेल्या धंद्यांना जरब बसवली असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.त्यातच पेणच्या धावटे परिसरात स्पाईस हॉटेल येथे दारूचा कोणताही परवाना नसताना तिथे अवैधपणे दारूचा गुत्ता चालविला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्यासह टीमने त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली तीथे जवळपास २१ जण वेगवेगळ्या टेबलवर बसून दारूचे सेवन करत असल्याचे आढळून आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.या कारवाईत दारूच्या बाटल्या, चाकणा, ग्लास, चमचे, टेबल असे मिळून एकूण ७ हजार १७० रुपयांचा माल जप्त केला आहे.याबाबत अधिकची माहिती पेण पोलिस घेत आहेत.तर पोलिसांच्या या कारवाईमुळे इतरांचे धाबे दणाणले आहेत.





Be First to Comment