
महेंद्र घरत यांनी भेल पुरीचा आस्वाद घेत मतदारांशी साधला संवाद
महाड , ता. 29 : महाड नगरपरिषद निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी महेंद्रशेठ घरत यांनी महाडमध्ये 25 व 26 नोव्हेंबरला मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी तेथील नागरिकांचा कॉंग्रेसकडे ओढा असल्याचे दिसून आले. कॉंग्रेस हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे, असे त्यांनी मतदारांना पटवून दिले. त्यानंतर त्यांनी चक्क भेल पुरीच्या स्टॉलवर आपला मोर्चा वळवला. तेथे भेल पुरीचा आस्वाद घेत मतदारांशी संवाद साधला. त्यामुळे महाडमधील मतदारांमध्ये महेंद्रशेठ घरत यांचीच चर्चा सुरू होती. त्यामुळे महाडमधील नगर परिषदचे कॉंग्रेसचे उमेदवार चांगल्या मतांनी विजयी होतील, असे चित्र दिसत आहे.
यावेळी कॉंग्रेसचे महाडमधील नगर परिषदचे उमेदवार, रायगडच्या प्रभारी श्रीमती राणीताई अग्रवाल, मिलिंद पाडगावकर आणि एम. जी. ग्रुपचे सहकारी उपस्थित होते.





Be First to Comment