

पेण, ता. २९ (वार्ताहर) : गेल्या पाच दहा वर्षांमध्ये पेण शहरात विविध विकास कामे झाली असून त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक, भुंडा पुल, नदी संवर्धन घाट, स्मशानभूमी, कब्रस्तान यासह रस्ते, गटारे यांचीही कामे होत आहेत तर रिंगरोडचे काम पावसामुळे रखडले ते लवकरच सुरू होऊन येत्या पाच वर्षांत शहराच्या विकासात्मक कामांमुळे येथील चेहरामोहरा बदलणार असल्याचे आमदार रवीशेठ पाटील यांनी सांगितले.
पेण पालिका निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या माध्यमातून प्रभाग ७ मध्ये उभे असणारे आफ्रिन अखवारे व सुभाष आवास्कर या दोन उमेदवारांसह थेट नगराध्यक्षाकरीता प्रितम पाटील यांच्या प्रचारार्थ खान मोहल्ला येथे दि. २८ रोजी रात्रीच्या सुमारास कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते.या सभेला खासदार धैर्यशील पाटील, आमदार रवीशेठ पाटील, माजी नगराध्यक्षा व उमेदवार प्रीतम पाटील, माजी जि.प.सदस्य डी.बी.पाटील, राष्ट्रवादी शहराध्यक्ष जितेंद्र ठाकूर, झेन नाईक, मुद्दूशेठ अखवारे आदिंसह मतदार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
यावेळी त्यांनी अधिक सांगितले की विरोधक नुसत्या विकासाच्या गप्पा मारतात मात्र हे भ्रष्टाचारी लोक यांनी अर्बन बँक बुडविली आणि अनेकांचे संसार उद्धवस्त केले ते कोणत्या तोंडाने मत मागत आहेत आपण अशा विरोधकांना जाब विचारला पाहिजे असे सांगून येणाऱ्या काळात विकासाला अधिक गती देत शहराचा चेहरामोहरा बदललेला दिसणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.तर आपल्या कुटुंबातीलच सदस्य म्हणून मी तिसऱ्यांदा नगराध्यक्ष पदाकरीता उभी आहे.या अगोदर सुद्धा आपण मला भरभरून प्रेम दिले तसेच प्रेम याही वेळेला मिळतील गेल्या दहा वर्षात आपण कुठेही विकास कामांसाठी मागे पडलो नाहीत असे मत थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रितम पाटील यांनी मांडले.





Be First to Comment