

प्रतिनिधी आवरे (मुकेश गावंड) स्वसंरक्षणात्मक संरक्षण ही काळाची गरज आहे स्वसंरक्षण म्हणजे कुठल्याही प्रकारचे शस्त्र हातात न घेता स्वतःचा बचाव करणे यासाठी प्रत्येकाने तत्पर असणे खूप गरजेचे आहे खास करून याचे शालेय विद्यालयापासून असे शिक्षण मिळाले तर नक्कीच याचे रूपांतर हे चांगल्या गोष्टीत व्हायला वेळ लागणार नाही यासाठी जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूल आवरे मधील इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी स्वसंरक्षण कॅम्प भानूबेन प्रवीण सहा माध्यमिक विद्यालय तारा येथे आयोजित करण्यात आला होता.
तसेच विद्यालयाभोवतालचा परिसर हा गावातील परिसर हा स्वच्छता अभियान असा दुहेरी विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीने सदर परिसर हा स्वच्छ केला तसेच विद्यालयातील सहकारी शिक्षक शुभम ठाकूर सर यांनी आत्मसंरक्षण आणि स्वच्छता या विषयावर अतिशय चांगल्या पद्धतीने उद्बोधन केले तारा सदर कार्यक्रम प्रसंगी तारा ग्रामपंचायतचे सदस्य सहकारी आणि विद्यालयातील विद्यार्थ्यांचा चांगल्या पद्धतीने सहभाग व सहकार्य मिळाले.
या रायगड जिल्ह्यात कर्नाला किल्ला या किल्ल्यावर संरक्षण याविषयी प्रात्यक्षिक दाखवण्यात आले तसेच पर्यटनातून गडकिल्ल्यांच्या विषयी माहिती ट्रेकिंगचा अनुभव घेऊन विद्यार्थ्यांनी या किल्ल्याला भेट दिली छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले म्हणजे हे महाराष्ट्राचे वैभव हे दाखवण्यासाठी विद्यार्थ्यांनी मनमुरादपणे आनंद मिळावा यासाठी शिक्षक वर्ग आणि चांगल्या पद्धतीने मुलांची ट्रेकिंग घडून आणले तसेच या किल्ल्यावर कराटेचे प्रात्यक्षिक सुद्धा करण्यात आली म्हणजे उदाहरणार्थ मुलींनी संरक्षणासाठी काठी चालवणे व इतर संरक्षक प्रात्यक्षिकेत करण्यात आली अशा प्रकारे जानकीबाई जनार्दन ठाकूर विद्यालय तर्फे संरक्षक कॅम्प कॅम्प व स्वच्छता मोहीम असा उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमामध्ये विद्यालयातील मुख्याध्यापिका सौ निकिता म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीने सहभाग घेतला





Be First to Comment