

पनवेल (प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर उच्च माध्यमिक (सीकेटी) विद्यालयात संस्थेचे कार्याध्यक्ष, लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या ७५ व्या वाढदिवसाच्या अमृतमहोत्सवानिमित्त आज (दि.२९) सांस्कृतिक समितीतर्फे जिल्हास्तरीय भरतनाट्यम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
भरतनाट्यम हा आपला सांस्कृतिक वारसा व अभिव्यक्ती यांचे प्रतीक असलेला नृत्य प्रकार आहे. भारताच्या नृत्य कलेचा तो एक महत्त्वाचा भाग आहे . या भरतनाट्यम स्पर्धेसाठी संस्थेचे कार्याध्यक्ष लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच संस्थेचे उपकार्याध्यक्ष वाय टी देशमुख, संस्थेचे संचालक मंडळ सदस्य स्वप्नील ठाकूर,संकुलातील मराठी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक कैलास सत्रे,मराठी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सुभाष मानकर, इंग्रजी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक संतोष चव्हाण,उच्च माध्यमिक विभागाचे प्राचार्य प्रशांत मोरे, ,इंग्रजी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका नीलिमा शिंदे, पर्यवेक्षक कैलास म्हात्रे, अजित सोनवणे, पर्यवेक्षिका वैशाली पारधी, स्वाती पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत आसपासच्या शाळा व महाविद्यालयातील एकूण २७ स्पर्धक विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्वक सहभाग घेऊन आपल्या भरतनाट्यम या नृत्यकलेचे अप्रतिम सादरीकरण केले .नृत्य कलेचे तंत्र, अभिव्यक्ती, ताल, रंगमंचावरील प्रस्तुती या गुणांच्या आधारे भरतनाट्यम स्पर्धेचे उत्कृष्ट परीक्षण शिवानी पाचरकर आणि ग्रीष्मा करिया या दोन्ही परीक्षकांनी केले.
स्पर्धेत सर्व स्पर्धकांचे भरतनाट्यम नृत्य अतिशय उल्लेखनीय होते. या स्पर्धेतून सई कदम, इ.११वी कॉमर्स(सी के टी उच्च माध्यमिक विद्यालय नवीन पनवेल ) हिने प्रथम क्रमांक, रेश्मा श्रीसेंथिल कुमार,इ. ९ वी (लोकनेते रामशेठ ठाकूर सीबीएससी स्कूल कामोठे) हिने द्वितीय क्रमांक तर अनन्या गडेपल्ली इ.१०वी (डीएव्ही पब्लिक स्कूल नवीन पनवेल) हिने तृतीय क्रमांक पटकावला. मान्यवरांच्या हस्ते या तीनही विजेत्या स्पर्धकांचा रोख बक्षीस रक्कम, ट्रॉफी व सर्टिफिकेट देऊन गौरव करण्यात आला. या स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांनी उत्कृष्ट प्रदर्शन केल्याबद्दल त्यांचाही सहभाग प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. वाणिज्य विभाग सहशिक्षिका योगिता जोरी यांनी स्पर्धेचे सुंदर सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास उपस्थित सर्व स्पर्धक विद्यार्थी , शिक्षक, सांस्कृतिक समिती सदस्य, परीक्षक व मान्यवर यांचे आभार व्यक्त करून सर्वांच्या संयुक्त प्रयत्नाने ही स्पर्धा यशस्वी झाली.





Be First to Comment