
तर अर्बन बँक बुडवणाऱ्या धारकरला मत मागण्याचा अधिकार नाही – नरेन जाधव
पेण, ता. २७ (वार्ताहर) : पेण अर्बन बँक बुडवून हजारो ठेवीदारांना देशोधडीला लावणाऱ्यांविरोधात गेल्या पंधरा वर्षापासून अर्बन बँक ठेवीदार संघर्ष समिती लढा देत असताना सहकार खात्याने २०२४ ला बॅकेच्या संचालकांकडून जवळपास २४ कोटी रूपये वसूल करण्याचे आदेश दिल्याने त्याला विलंब न करता तातडीने ते वसुल करण्यात यावे अशी मागणी करत अशा बॅक बुडव्या धारकरला
पेण नगरपालिका निवडणुकीत मत मागण्याचा अधिकार नाही असे वक्तव्य संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष नरेन जाधव यांनी दि.२७ रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
पेण अर्बन बॅकेत हजारों गोरगरिबांनी आपली पुंजी ठेवीली होती मात्र बँकेच्या अनियमिततामुळे ७५० कोटी रुपयांचा घोटाळा होऊन बँक बंद पडली यामध्ये अनेकांचे पैसे अडकून पडल्याने संपूर्ण खातेदार ठेवीदार देशोधडीला लागले तर कित्येक ठेवीदार मयत सुद्धा झाले आहेत.त्यामुळे अनेक वर्ष संघर्ष करत २०२४ ला सहकार खात्याने प्रत्येक संचलकांकडून २९,९०,३०,८८६ रुपये म्हणजेच जवळपास २४ कोटी रुपये प्रत्येकी वसूल करण्याचे आदेश दिल्याने सरकारने त्याची अंमलबजावणी तातडीने करावी अशी मागणी करत सदरची बँक बुडवणाऱ्या शिशिर धारकरला या नगरपालिका निवडणुकीत मत मागण्याचा अधिकार नाही असेही त्यांनी शेवटी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे.





Be First to Comment