
पेण, ता. २७ (वार्ताहर) : पेण नगरपालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे पाच उमेदवार उभे असून त्यांना जनतेने स्वीकारले आहे त्यामुळे या निवडणुकीत आमचे पाच शिलेदार इतिहास घडवणार असल्याचे आमदार महेंद्र दळवी यांनी सांगितले.पेण नगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीत शिवसेना शिंदे गटाच्या वतीने रामवाडी, रोहिदास नगर, फणस डोंगरी यासह इतर प्रभागात विश्वास पाटील, प्रकाश रामाणे, भूषण कडू, भरत साळवी, ज्योती म्हात्रे हे पाच उमेदवार उभे असल्याने त्यांच्या प्रचारार्थ आज अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांची शहरात प्रचार रॅली काढण्यात आली.
यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की आम्ही युतीचा धर्म पाळणारे आहोत येथे चर्चेअंती एक सीट सोडून ती कमळ चिन्हावर लढावावी असा शब्द आल्यावर आम्ही अंदाज बांधला की माहिती तोडण्यासाठी धृतराष्ट्राने राष्ट्रवादीला सुपारी दिली आहे.परंतु पेणचा इतिहास मी सुद्धा जवळून पाहिला आहे.रायगड जिल्ह्यात सर्वात जास्त ताकद शिवसेना शिंदे गटाची आहे.त्यामुळे जनतेच्या आशीर्वादाने पाच उमेदवार उभे करून ते निवडून सुद्धा येणार असल्याने पेणच्या विकासाला अधिक भर देणार असून येणा-या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत सर्वच्या सर्व जागा लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी उपजिल्हा प्रमुख उदय कुथे, तालुका प्रमुख तुषार मानकवले, शहर प्रमुख दिनेश पाटील, लहु पाटील, प्रमोद मोरे, महिला आघाडीसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.





Be First to Comment