Press "Enter" to skip to content

रिपाई पनवेल शहर अध्यक्ष निलेश सोनावणे यांनी आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

देशातील प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार देणारे संविधान डॉ बाबासाहेबानी दिले : आमदार प्रशांत ठाकूर 

पनवेल / प्रतिनिधी भारताचे संविधान जगात अद्भुत आहे देशातील प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार देणारे संविधान डॉ बाबासाहेबानी लिहिले त्यानंतर जगभरात या संविधानाचा गौरव केला जातोय .बाबासाहेबानी देशाला दिलेल्या संविधानाबद्दल कृतज्ञता भावना केवळ दलित समाज करीत नसून सर्वच समाज करीत आहे .आज या संविधानाला ७५ वर्षे होत असून संविधानाच्या माध्यमातून देहशतील प्रत्येक नागरिकाला पुढे जाण्याचे बळ दिले आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ साली संविधान दिन हा देशभरात संविधान दिन साजरा केला पाहिजे अशी संकल्पना मांडली देशाचे केंद्रीय राज्य मंत्री रामदासजी आठवले यांनी मोदीजींनी देशाच्या विकासाठी जे जे निर्णय घेतेले त्यांना पाठिंबा दिला असल्याने आठवले साहेबांचे देखील या संविधान गौरव दिनाच्या निम्मिताने आभार आमदार ठाकूर यांनी आपल्या  भाषणात व्यक्त केले.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पनवेल शहर अध्यक्ष निलेश सोनावणे यांनी संविधान गौरव दिन व लोकनेते  माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त पनवेल महानगर पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी  शिबीर नवीन  पनवेल येथे आयोजित केले होते. या शिबिराचे उदघाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी ते बोलत  होते  या शिबिराला कामगारांचा मोठा प्रतिसाद लाभला .

संविधान गौरव दिन  व  लोकनेते  माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे पनवेल शहर अध्यक्ष निलेश सोनावणे यांनी पनवेल महानगर पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले होते .डोळे तपासणी ,सीबीसी ,इसीजि,कॅल्शियम तपासणी ,मधुमेह तपासणी ,हाडांचे आजार , तसेच मोफत मल्टीव्हिटॅमिन च्या औषधांसहित  खोकला ,सर्दी ची औषधे मोफत वाटप करण्यात आली या आरोग्य शिबिराला कर्मचारी वर्गाचा मोठा प्रतिसाद लाभला . 

यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी संविधानाची गौरव गाथा  जागविण्याचे निलेशजीनी  या संविधान गौरव दिनानिमित्त आयोजन केल्याने त्यांचे अभिनंदन . जे पनवेल शहराची सेवा करता त्या पनवेल महानगर पालिका सफाई कर्मचाऱ्यांची  सेवा आज निलेश सोनावणे मोफत आरोग्य तपासणी शिबिराच्या माध्यमातून करीत असल्याने निलेश सोनावणे आणि त्यांच्या  सहकाऱ्यांचे   अभिनंदन  आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले .आज देशभरात संविधान गौरव दिनानिमित्त कार्यक्रम घेतले जात आहेत पनवेल मध्ये  निलेश  सोनावणे यांनी हा संविधान गौरव दिन आयोजित केल्याबाबदल त्यांचे आणि त्यांच्या सर्व  सहकाऱ्यांचे विशेष अभिनंदन आमदार प्रश्नात ठाकूर यांनी केले .

३६५ दिवस ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता आपले शहर स्वछ सुंदर ठेवण्याची पनवेल शहराची सेवा करणाऱ्या साफसफाई करणाऱ्या पनवेल महानगर  पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचे आरोग्य सुदृढ रहावे, निरोगी रहावे याकरिता त्यांची वैद्यकीय तपासणी वेळेचे वेळी होणे गरजेचे आहे हा संकल्प मनाशी ठेवून निलेश सोनावणे यांनी या शिबिराचे आयोजन  केले असल्याचे आपल्या प्रास्ताविकात म्हटले .
या कार्यक्रमात पनवेल महानगर पालिका जिल्हा क्षेत्र अध्यक्ष प्रभाकर कांबळे ,जिल्हा प्रवक्ते तथा पनवेल महानगर पालिका जिल्हा क्षेत्र कार्याध्यक्ष मोहन गायकवाड ,आधार हॉस्पिटलचे डॉ संतोष  पांढरे ,माजी नगराध्यक्ष  संदीप पाटील ,माजी नगरसेवक गणेश कडू ,आदींनी आपले मनोगत व्यक्त केले .या कार्यक्रमासाठी के आ बांठिया विद्यालयाचे प्राचार्य बी एस माळी, रिपाई खांदेश्वर शहर अध्यक्ष दिनेश जाधव , आधार हॉस्पिटल चे संचालक  डॉ मिलिंद पराडकर, विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे विश्वस्त धावू पाटील ,विजय पाटील, मुकुंद कांबळे ,कल्पेश कांबळे, संदेश पाटील, मयूर गायकवाड ,विकेश पाटील ,दीपक भोपी ,संजय कांबळे ,आदींसह सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्तिथ होते ,या कार्यक्रमासाठी पनवेल महानगर पालिकेचे आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त वैभव विधाते , आरोग्य निरीक्षक अरुण कांबळे ,अनिकेत जाधव आदींचे सहकार्य लाभले .

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.