
पेण नगरपरिषदेच्या निवडणुकीत उतरलेल्या उमेदवाराचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल ; काँग्रेस कडून जोरदार टीका
पेण, दि. 25 ( प्रतिनिधी ) :- पेण नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रचारा दरम्यान मतदारांकडे फिरत असताना येथील उमेदवाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्याची माहिती अनेकांकडून मिळाली त्यामुळे मला खंत वाटतेय की सत्ताधारी पक्षाने अशा उमेदवाराला उमेदवारी दिलीच कशी की जे महिलांचा सन्मान करू शकत नाहीत त्यामुळे ही फार शरमेची बाब आहे अशा उमेदवाराला निवडून द्यायचं का असा सवाल काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार नंदा म्हात्रे यांनी सत्ताधाऱ्यांना केला आहे.

२०२५ पेण नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक होत असताना या निवडणुकीत २४ नगरसेवक आणि थेट नगराध्यक्ष असे एकूण २५ सदस्य निवडून जाणार आहेत मात्र यातील सहा नगरसेवक या आगोदरच बिनविरोध झाले आहेत.मात्र याच निवडणुकीत उभा असणा-या उमेदवाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल झाला असल्याने सत्ताधारी पक्षाकडे दुसरा उमेदवार नव्हता का एकीकडे महिलांना सन्मानाची वागणूक देणारा पक्ष म्हणून सांगत असता मग अशा उमेदवाराला उभा करून मत मागत आहे त्यामुळे येथील महिलांनी विचार करणे गरजेचे आहे असे त्यांनी शेवटी पत्रकार परिषदेत सांगितले.



Be First to Comment