Press "Enter" to skip to content

नवी मुंबई पोलिसांच्या परिक्षेत्रातील 22 पोलीस ठाणे आणि 11 विविध शाखांना आयएसओ मानांकनाचे प्रमाणपत्र प्रदान


पनवेल दि. २६ ( वार्ताहर ) :नवी मुंबई पोलिसांच्या सेवांची गुणवत्ता अधिक उंचावण्यासाठी आयुक्तालयाने मोठी झेप घेतली आहे. आयोजित गुन्हे आढावा बैठकीदरम्यान आयुक्त मिलिंद भारंबे यांनी परिक्षेत्रातील 22 पोलीस ठाणे आणि 11 विविध शाखांना आयएसओ मानांकनाचे प्रमाणपत्र प्रदान करून सन्मानित केले.

या मानांकनामागील मुख्य उद्दिष्ट म्हणजे नागरिकांना मिळणाऱ्या पोलीस सेवांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे निकष लागू करणे, कामकाज अधिक पारदर्शक बनवणे आणि प्रत्येक स्तरावर विश्वासार्हता वाढवणे. सर्व शाखांमध्ये काम वेळेत, नियमबद्ध पद्धतीने आणि उच्च कार्यक्षमतेने पूर्ण व्हावे, तसेच प्रत्येक प्रक्रियेसाठी ठोस मानक कार्यप्रणाली लागू करणे, हे आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे.या मानांकनामागील मुख्य उद्दिष्ट म्हणजे नागरिकांना मिळणाऱ्या पोलीस सेवांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे निकष लागू करणे, कामकाज अधिक पारदर्शक बनवणे आणि प्रत्येक स्तरावर विश्वासार्हता वाढवणे. सर्व शाखांमध्ये काम वेळेत, नियमबद्ध पद्धतीने आणि उच्च कार्यक्षमतेने पूर्ण व्हावे, तसेच प्रत्येक प्रक्रियेसाठी ठोस मानक कार्यप्रणाली लागू करणे, हे आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे.

या प्रमाणित यादीत वाशी परिमंडळातील वाशी, एपीएमसी, रबाळे, कोपरखैरणे आणि रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. पनवेल परिमंडळात खारघर, तळोजा, कळंबोली, खांदेश्वर, कामोठे, पनवेल शहर आणि पनवेल तालुका पोलीस ठाण्यांना मानांकन मिळाले. तुर्भे परिमंडळातील तुर्भे एमआयडीसी, नेरूळ, एनआरआय, सीबीडी बेलापूर आणि सानपाडा पोलीस ठाणे यांचा समावेश आहे.पोर्ट विभागात उरण, न्हावाशेवा, मोरा सागरी आणि उलवे पोलीस ठाण्यांना हे मानांकन देण्यात आले. त्याचबरोबर गुन्हे शाखा (मुख्यालय), विशेष शाखा, प्रशासन, डीसीपी ट्रॅफिक, सायबर सेल, पोलिस मुख्यालय, मोटार ट्रान्सपोर्ट विभाग आणि पुरावा व्यवस्थापन केंद्र (ईएमसी) यांनाही आयएसओ प्रमाणपत्र मिळाले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.