Press "Enter" to skip to content

जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूल आवरे मध्ये प्रेमळ मायाळू आजी आजोबा दिन साजरा


प्रतिनिधी आवरे (मुकेश गावंड)

भारत हा सांस्कृतिक परंपरा जतन करणारा जोपासणारा देश आहे भारत हा सांस्कृतिप्रधान देश आहे घराचं घर पण जर टिकून राहत असेल तर ते आई वडील यानंतर खऱ्या अर्थाने आजी आजोबा यामुळे घरात खऱ्या अर्थाने संस्काराचे बीजारोपण हे अप्रत्यक्ष म्हणजे आजच्या काळात आजीआजोबा नकळतपणे आपल्या नातवंडे याबर करत असतात आई वडील जेवहा आपल्या कामानिमित्त बाहेर गेल्यावर आपल्या नातू च संगोपन व सांस्कृतिक परंपरा यचो ओळख व बोधात्मक गोष्टी हे आजीआजोबा सांगून त्यांची जणू काही जडण घडण करत असतात अश्या या आजी आजोबांचा आपल्या प्रत्यक्ष नातवंडांना शाळेची वाट दाखविताना शाळेत आपला नातू शिक्षणाचा मान बिंदू ठरताना आज जानकीबाई जनार्दन ठाकूर इंग्लिश मेडियम स्कुल आवरे मध्ये हा दिन अतिशय मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

संस्थेचे अध्यक्ष स्वर्गीय अशोक ठाकूर सर यांच्या प्रेरनेणें चाललेले हे माध्यमिक विद्यालय व त्यात सांस्कृतिक उपक्रमाचा सहभाग हे विद्यालयच्या स्थापनेपासून ते आजतागायत वैशिष्ट्य होय अशोक ठाकूर सर याना अभिप्रेत असे उपक्रम विदयलायात राबविले जातात व विद्यार्थ्यांच्या मानपटल यावर सांस्कृतिक परंपरा या रूजविल्या जातात
या दिवशी विद्यार्थ्यांना चे आजीआजोबा व विद्यार्थी असा अनोखा संगम आपल्याला विद्यालयात पाहायला मिळाला तसेच सर्व आजीआजोबा यासाठी मनोरंजन म्हणून छोट्याशा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यात विविध इय्यतेमधील विद्यार्थ्यांनि आपल्या कलाविष्कार दाखविला व आपल्या नातवाच गोड कौतुक हे आजी आजोबांनी केले.

सदर प्रसंगी विदयलायाच्या मुख्यद्यापीका सौ निकिता म्हात्रे शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विद्यार्थ्यांचे आजी आजोबां हे उपस्थित होतेलाभली.तसेच हा कार्यक्रम विद्यालयात राबविल्या बद्दल संस्थेचे सचिव विश्वस्त श्री वामन ठाकूर , अलका ठाकूर , प्रसाद ठाकूर सिंधू ठाकूर व आदिनाथ ठाकूर,रिना ठाकूर यांनी विशेष कौतुक केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.