
पेण, दि. 26 (प्रतिनिधी) : – गेल्या अनेक वर्ष सामाजिक कार्य करत सर्वसामान्यांकरीता अहोरात्र झटणारा उमेदवार भरत साळवी असल्याचे शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख तुषार मानकवले यांनी सांगितले आहे.
पेण नगरपालिका निवडणुकीत प्रभाग 6 ब मध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार भारत साळवी यांना जनतेचा वाढता पाठींबा पाहता आणि त्यांनी येथे गेल्या अनेक वर्ष केलेल्या कामाची सचोटी त्यांना जनतेचे प्रेम मिळणार आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि आमदार महेंद्र दळवी यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून त्यांनी शिंदे गटातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याने त्यांना आमदार महेंद्र दळवी यांनी पूर्णतः ताकद दिली आहे.त्यामुळे पेण शहराच्या विकासाकरिता तसेच येथील प्रलंबित असणाऱ्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी ते नेहमीच पुढे असणार आहेत.
आमदार महेंद्र दळवी यांच्या माध्यमातून शहराच्या विकासाकरीता जास्तीत जास्त निधी मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार असल्याचेही त्यांनी प्रचाराच्या रॅली दरम्यान सांगितले.तर शहरातील प्रभाग क्रमांक सहा मध्ये येणाऱ्या प्रत्येक भागामध्ये मी घर टु घर गेलो असून जनता मला प्रेम देत आहे. जनतेच्याच आशीर्वादाने येत्या काळात शहरात स्वच्छ पाणीपुरवठा, रस्ते, गटारे, वीज, दवाखाना, प्रवासी वाहतूक तसेच शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी आणि प्रभागांमधील असणारी विकासात्मक कामे तातडीने सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे उमेदवार भरत साळवी यांनी यावेळी बोलून दाखविली आहे.



Be First to Comment