
हातगाड्या आणि फेरीवाल्यांमुळे पादचारी आणि वाहनचालक दोघांनाही करावा लागतो सततच्या गैरसोयींचा सामना ; महानगर पालिकेचे “अर्थपूर्ण” दुर्लक्ष ?
सिटी बेल : बेलापूर प्रतिनिधी
नवी मुंबई महानगर पालिकेच्या हद्दीतील बेलापूर गाव हे संध्याकाळच्या वेळी फेरीवाल्यांनी रस्त्यावर बस्तान मांडल्याने वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणात गंभीर बनली आहे. हातगाड्या आणि फेरीवाल्यांमुळे रस्त्यावर जागा कमी होत असल्याने पादचारी आणि वाहनचालक दोघांनाही सततच्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.

बेलापूर गावातील वाहतुकीची कोंडी होत आहे, या कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त झाले असून, वेळेत गंतव्यस्थानी पोहोचणे कठीण झाले आहे. त्याचबरोबर कुठलेही पर्यायी मार्ग नसून फेरीवाल्यांनी फुटपाथ आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंवर जागा व्यापल्याने वाहनांना मार्ग काढणे कठीण बनले असून पादचाऱ्यांनाही धोका वाढला आहे. इमारतीच्या परिसरात हातगाड्यांनी रांग लावल्याने हा मार्गही संध्याकाळी पूर्ण ठप्प होतो. सततच्या कोंडीमुळे रुग्णवाहिका व सार्वजनिक वाहतुकीलाही मोठा अडथळा निर्माण होत आहे त्याचबरोबर पार्किंग ची व्यवस्था हि नसल्याने नागरिकांनी वाहने पार्क कुठे करावीत हा प्रलंबित प्रश्न ऐरणी वर येऊन ठेपला आहे. रहिवासी आणि वाहनचालकांनी यामधील वाद विकोपाला जात आहे.
बेलापूर गावातील मंदिरे आणि तलाव इथे अस्वछता निर्माण झाली असून पुरातन धार्मिक स्थळ हे लवकरच कलुषित तर होणार नाही ना याचीही भीती व्यक्त केली जात आहे असे हिंदू संघटनांनी मतही व्यक्त केले आहे. बेलापूर गावातील विज्ञान म्हात्रे, सचिन सोनटक्के आणि गावातील इतर नागरीकाईंनी ह्याची खंत व्यक्त केली आहे आणि ह्या सगळ्यावर प्रशासन कारवाई का करत नाही ह्यावर संशायाच्या नजरेने बघितलं जात आहे.



Be First to Comment