Press "Enter" to skip to content

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची २६ नोव्हेंबरला पेण मध्ये जाहीर सभा

नगरपालिका निवडणुकीत विरोधकांचा सुपडा साफ होणार- आ. रवीशेठ पाटील

पेण ( वार्ताहर) : देशभरात भाजपची लाट उसळली असून पेण नगरपालिकेमध्ये सुद्धा कधी नव्हे ते इतिहास घडत सहा नगरसेवक बिनविरोध झाल्याची नोंद होत असल्याने या निवडणुकीत शिशीर धारकर गटाचा सुपडा साफ होणार असल्याचे आमदार रवीशेठ पाटील यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

गेल्या दहा वर्षात शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कोट्यावधीचा निधी सरकारच्या माध्यमातून आणला असून यामध्ये शहरातील अंतर्गत रस्ते, गटारे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह व स्मारक, छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, छत्रपती संभाजी महाराजांचा चौक, तलाव सुशोभीकरण यासह रिंग रोड साठी ६० कोटी रुपये निधी आणला आहे मात्र पावसामुळे सदरचे काम लांबणीवर गेले होते काही दिवसातच अर्धवट असलेले काम सुरू होणार आहे.त्यामुळे शहराच्या विकासाला गती देण्याचे काम भाजप सरकारच्या वतीने आम्ही केले आहे.याउलट ज्यांनी दहा वर्षांपूर्वी शहराचा भकास केला अर्बन बँक बुडवली यामध्ये अनेक लोक देशोधडीला लागले त्या धारकरला मत मागण्याचा अधिकार नाही त्यामुळेच तर भाजपा राष्ट्रवादीचे सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत शिशिर धारकर विरोधकांचा सुपाडा साफ होणार असून २४ नगरसेवक ल एक नगराध्यक्ष म्हणजे संपूर्ण २५ जण निवडून येणार आहेत.या निवडणुकीत विरोधकांचा सुपडा साफ होणार असून त्यांना तोंड दाखवण्याची जागा राहिली नसल्याचे आमदार रवीशेठ पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.तर येत्या २६ नोव्हेंबर रोजी भाजपचे स्टार प्रचारक तथा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पेणमध्य, येत असून नगरपालिकेच्या उर्वरित उमेदवारांकरीता त्यांची जाहीर सभा होत आहे.त्यामुळे सर्व नागरिकांनी या सभेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.यावेळी बिनविरोध झालेल्या सहा नगरसेवकांचा आमदार रवीशेठ पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

पेण शहराच्या भेडसावत असणाऱ्या काही मूलभूत समस्यांसह पिण्याच्या पाण्यासाठीची योजना गेले कित्येक वर्ष रखडली आहे याकरीता शहरासाठी १६० कोटीची पाणी पुरवठा योजना लवकरच येत असून येथे नवीन पाईपलाईन टाकून जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात येऊन शहराच्या विकासाकरीता अधिक निधी उपलब्ध करण्याचा दृष्टिकोन आम्ही ठेवला आहे.

रवीशेठ पाटील- आमदार पेण विधानसभा

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.