रामचंद्र म्हात्रे विद्यालयात मोफत कराटे प्रशिक्षणाचा शुभारंभ
By City Bell on November 22, 2025
प्रतिनिधी आवरे( हिमांशू पटेल ) महिला व बाल कल्याण विभाग अलिबाग रायगड यांच्या विद्यमाने मुलींसाठी स्वसंरक्षण व शारीरिक विकासासाठी मोफत कराटे प्रशिक्षणाचा शुभारंभ दिनांक २१ नोव्हेंबर २०२५ रोजी करण्यात आला.
मुलींसाठी सुरू करण्यात आलेल्या कराटे प्रशिक्षणात विद्यार्थिनींमध्ये स्वसंरक्षण, आत्मविश्वास आणि शारीरिक तंदुरुस्ती वाढवणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे.
या प्रशिक्षणाचे उद्घाटन एशियन गोल्ड मॅडलिस्ट श्री.गोपाळ म्हात्रे, ४ वेळा नॅशनल गोल्ड मेडल प्राप्त श्री. परेश पावसकर, प्राचार्य सुभाष ठाकुर या मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. कार्यक्रमाला विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. निवास गावंड यांनी केले. तर श्री.शेखर म्हात्रे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
प्रशिक्षकांनी कराटेचे मूलभूत तत्त्वे, स्वसंरक्षण तंत्रे आणि शिस्तीचे महत्त्व विद्यार्थिनींना समजावून सांगितले. सौ.संगीता म्हात्रे यांच्या मार्गदर्शनखाली सर्व विद्यार्थिनींनी सक्रिय सहभाग नोंदवत उत्साहाने प्रात्यक्षिके सादर केली. हे कराटे प्रशिक्षण पुढील एक महिना चालणार आहे.
Be First to Comment