

मनोज पाटील (कळंबोली)
नुकत्याच परतीच्या मान्सन पाऊसाने महाराष्ट्रातील घाटमाथ्यावरील अनेक जिल्हांना झोडपून काढून पूरग्रस्त वातावरण निर्माण केले होते. अशातच या पाऊसाने बीड जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये व विद्यार्थ्यांच्या घरांमध्ये पाणी शिरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्यांचे नुकसान झाले होते. याची जाणीव ठेवून सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या कळंबोली येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र पालवे यांनी शाळेतील विद्यार्थी व शिक्षक-शिक्षेत्तर कर्मचारी यांना शैक्षणिक साहित्य जमा करण्याच्या आवाहन केले होते. त्या प्रमाणे विद्यार्थी व शिक्षक-शिक्षेकेत्तर कर्मचारी यांनी शैक्षणिक साहित्य जमा केले होते. ते शैक्षणिक साहित्य बीड चे जिल्हाधिकारी विवेक जाॅनसन यांच्या कडे नुकतेच सुपुर्द केले.
कळंबोली येथील सुधागड विद्या संकुल नेहमीच राष्ट्रीय आपत्ती मध्ये मदत करण्यात पुढे असते. या वर्षी परतीच्या मान्सून पर्जन्याने बीड जिल्ह्यातील नागरिकांची शेती, घरे दारे, व्यवसाय यांचे अतोनात नुकसान केले होते. महाराष्ट्र शासन त्याच बरोबर विविध संस्था – संघटना यांनी मुलभूत गरजा असणार्या वस्तू पूरग्रस्थांना पोहचवण्यात आल्या होत्या मात्र शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्याचे झालेले नुकसान त्या मुळे त्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणूनच संकुलाचे प्राचार्य राजेंद्र पालवे यांनी विद्यार्थी , शिक्षक व स्वतः शैक्षणिक साहित्य जमा केले.
या मध्ये खोडरबर पासून ते दप्तरापर्यंत साहित्याचे ३०० किट तयार करून ते २४ मोठ्या बाॅक्स मध्ये टाकून बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल तहसिलदार नरेंद्र कुळकर्णी यांच्या मार्फत बीड जिल्हाधिकारी विवेक जाॅनसन यांच्या कडे सुपुर्त केले. या वेळी जिल्हाधिकारी जाॅनसन यांनी सुधागड विद्या संकुलाचे प्राचार्य राजेंद्र पालवे, विद्यार्थी व शिक्षक-शिक्षेकेत्तर कर्मचारी यांचे कौतुक करून तसे कौतुक प्रमाणपत्र देवून आभार हि मानले.
सुधागड एज्युकेशन सोसायटी च्या कळंबोली येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या या उपक्रमामुळे बीड व रायगड जिल्ह्यातील अभिनंदन होत आहे.



Be First to Comment