मुंबई पुणे एक्सप्रेस मार्गावरील बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित मिसिंग लिंक प्रकल्पाच्या उद्घाटनाची तब्बल चौथी डेडलाईन हुकण्याची चिन्हे समोर दिसत आहेत. तूर्तास टायगर व्हॅली वरील केबल स्प्रेड पुलाचे काम पूर्ण होत आलेले असले तरी देखील डिसेंबर अखेरपर्यंत रस्ता सुरू होण्याची कुठलीही चिन्ह दिसत नाहीत. या पूलाचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी आणखीन किमान चार महिने लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्घाटनासाठी २०२६ च्या मध्यापर्यंत वाट पाहावी लागेल.
मिसिंग लिंक हा १३.३ किलोमीटर लांब, आठपदरी नियंत्रित प्रवेश मार्ग आहे. हा मार्ग २० किलोमीटर लांब धोकादायक आणि वाहतूक कोंडीने होत असलेल्या लोणावळा-खंडाळा घाट मार्गाला पर्याय असेल. यामुळे पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील अंतर सहा किलोमीटरने कमी होईल आणि प्रवासाचा वेळ ३० मिनिटांनी वाचेल. ‘प्रकल्प पूर्ण झाल्यावर पुणे-मुंबई प्रवासाला व नागरी आणि आर्थिक विकासाला मोठी गती मिळेल.
११ किमीचे दोन बोगदे निर्माण करणे, १३२ फूट उंचीवर केबल-स्टेड पूल बांधणे हे सारे आव्हानात्मक आहे. यामध्ये वनखात्याच्या विविध परवानग्या आणि नैसर्गिक परिस्थिती यांचा अडथळा देखील कामामध्ये होत आहे.या प्रकल्पात खोपोली एक्झिटपासून लोणावळ्यापर्यंत दोन्ही दिशेने चार मार्गिकांसाठीचे दोन बोगदे आहेत. पहिला बोगदा नऊ किलोमीटर, तर दुसरा बोगदा दोन किलोमीटरचा आहे. या बोगद्याला जोडणारा आणि टायगर व्हॅलीवर बांधला जाणारा ‘केबल-स्टेड पूल’ जमिनीपासून सुमारे १३२ फूट उंचीवर आहे.
राज्य सकारच्या बहुप्रतीक्षित मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या लोकार्पणाचा डिसेंबरचा मुहूर्त हुकण्याची शक्यता आहे. राज्य विधिमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीचा पाहणी दौरा नुकताच पार पडला. ‘प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर असला, तरी डिसेंबरमध्ये लोकार्पण करण्याची मुदत हुकणार आहे.२०१९ मध्ये कामास प्रारंभ झालेल्या ६,६९५कोटींच्या या प्रकल्पाच्या चार डेडलाइन हुकल्या आहेत. प्रकल्प ९६ टक्के पूर्ण झाला असला, तरी सुरक्षा प्रमाणपत्र, पर्यावरण मंजुरी, नियंत्रण केंद्र या बाबींना वेळ लागणार आहे.
Be First to Comment