
विनोद चव्हाण व विभा चव्हाण यांनी भुतान मध्ये घडविला इतिहास
सिटी बेल : भूतान
संयुक्त भारत खेल फौंडेशन यांनी दिनांक, १४/१५/१६ आणि १७ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत थिंपू ( भूतान) येथे १२ व्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन केले होते.
या स्पर्धेत भारत, भूतान, थायलंड, म्यानमार, बांगलादेश, श्रीलंका,, नेपाळ, मलेशिया, सिंगापूर, इंडोनेशिया, आणि फिलीपाईन्स या देशातील सुमारे ७६५ खेळाडूंचा सहभाग होता. या स्पर्धेत नवी मुंबईतील श्री विनोद चव्हाण असिस्टंट कमिशनर ऑफ पोलिस ACP नवी मुंबई निवृत , पोलिस अधिकारी व कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ विभा विनोद चव्हाण पोलिस उप अधिक्षक, रायगड निवृत्त त्याही नवी मुंबई ,निवृत संघटनेच्या उपाध्यक्ष आहेत या पती पत्नीनी भारतीय संघातून सहभाग घेतला होता.

तसेच या स्पर्धेत श्री सिताराम न्यायनिर्गुणे निवृत पोलिस उपायुक्त
महाराष्ट्र,निवृत पोलिस संघटनेचे सह अध्यक्ष आहेत यांनी सहभाग घेतला होता त्यांनीही सुवर्ण पदक पटकावले आहे (लाँग टेनिस )
सदर स्पर्धेत श्री विनोद चव्हाण यांनी गोळा फेक,थाळी फेक,आणि हातोडा फेक या तीनही स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले आहे. तर सौ विभा विनोद चव्हाण यांनी थाळी फेक व गोळा फेक या दोनही खेळात सुवर्ण पदक पटकावले आहे त्यामुळे एक्काच घरात पती पत्नी यांनी भारताला पाच सुवर्ण पदके जिंकून दिली आहेत त्याबद्दल निवृती नंतर ही त्यांनी देशासाठी केलेल्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

तसेच नवी मुंबई तील श्री सानपाडा जेष्ठ नागरिक संघाचे सदस्य श्री. उत्तम माने यांनी ७०+ वयोगटात भारतीय संघात सहभाग घेतला होता. तसेच रायगड जिल्ह्यातील रसायनी मधील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड पाताळगंगा मधील श्री. घनश्याम माशेलकर यांनी ५५+ वयोगटात भारतीय संघात सहभाग घेतला होता. वरील आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत श्री. उत्तम माने यांनी लांब उडी थाळी फेक, व हातोडा फेक स्पर्धेत सहभागी होवून तीन सुवर्णपदके जिंकली. तर श्री घनश्याम माशेलकर यांनी १००मी.धावणे, लांब उडी, आणि तिहेरी उडी या तीन स्पर्धेत सहभागी होवून तीन सुवर्णपदके जिंकली या सुवर्णमय कामगिरीबद्दल दोघांचेही सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.



Be First to Comment