

पनवेल (प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगु काना ठाकूर अर्थात सी. के. टी. विद्यालय इंग्रजी माध्यम प्राथमिक विभागातर्फे संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवीवर्ष निमित्त प्रोग्राम कार्ड डेकोरेशन स्पर्धेचे संस्था स्तरावर आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या सदस्या वर्षा प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले.
या स्पर्धेत संस्थेतील शिक्षकांनी सहभाग नोंदवला होता. सहभागी शिक्षकांनी आपल्या सर्जनशीलतेचा उत्कृष्ट आविष्कार घडवून एकापेक्षा एक आकर्षक प्रोग्राम कार्ड सादर केले. परीक्षक म्हणून कला क्षेत्रातील जाणकार प्रविण जाधव आणि भारतभूषण पाटील यांनी काटेकोर परीक्षकाची भूमिका बजावत विजेत्यांची निवड केली. स्पर्धेत सी. के. टी. विद्यालय इंग्रजी माध्यम प्राथमिक विभागाच्या स्नेहल किशोर कडव यांनी प्रथम क्रमांक, रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल खारघरच्या रूपाली म्हात्रे यांनी द्वितीय क्रमांक, तर चांगू काना ठाकूर विद्यालय इंग्रजी माध्यम माध्यमिक विभागातील महेश पोपेटा यांनी तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्यांचे वर्षा ठाकूर यांनी अभिनंदन करत सर्व सहभागी शिक्षकांचे विशेष कौतुक केले.
या वेळी वर्षा प्रशांत ठाकूर, स्पर्धेचे परीक्षक प्रविण जाधव, भारतभूषण पाटील, मुख्याध्यापिका निलिमा शिंदे, इंग्रजी माध्यम माध्यमिक विभागाच्या पर्यवेक्षिका नीरजा अधुरी, पूर्व प्राथमिक विभागाच्या पर्यवेक्षिका वैशाली पारधी, स्पर्धाप्रमुख अनघा भोसले यांच्यासह शिक्षक उपस्थित होते. ही संपूर्ण स्पर्धा मुख्याध्यापिका निलिमा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नाने यशस्वीरीत्या पार पडली.



Be First to Comment